Join us  

"सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान"; कंगनाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 10:33 AM

सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, असं वक्तव्य कंगना रणौतने केलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. काय म्हणाली कंगना बघा

कंगना रणौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. कंगनाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. कंगना सतत तिच्या राजकीय आणि सामाजिक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगना यंदा लोकसभा निवडणुकीलाही उभी आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे हिमाचल प्रदेशातील मंडी भागातून कंगना लोकसभेची उमेदवार म्हणून उभी राहिली आहे. अशातच कंगनाने एक विधान केलंय ज्यामुळे तिने पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतलाय. 

कंगनाने 'टाईम्स नाऊ समिट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिच्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली आहे. कंगनाने संवाद साधताना एक वक्तव्य केलं की, "मला आधी एक गोष्ट स्पष्ट करु द्या की, भारताचे पहिले प्रधानमंत्री सुभाषचंद्र बोस कुठे गेले?" कंगनाने केलेलं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे. अनेकांनी कंगनाची तुलना आलिया भटशी केली आहे.

याशिवाय अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनावर टीका केली आणि म्हणाले की, "सुप्रीम जोकर पार्टीचे हे विदुषक.. किती मोठा अपमान.." अशा शब्दात प्रकाश यांनी कंगनावर टीका केली. कंगनाच्या या वक्तव्यावर अनेक स्तरांवर तिच्यावर टीका होत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचं नाव न घेता कंगनाने सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेतलं. आता या वक्तव्याबद्दल कंगना माफी मागणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :कंगना राणौतनेताजी सुभाषचंद्र बोसजवाहरलाल नेहरू