Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज

By रूपाली मुधोळकर | Updated: October 13, 2020 15:12 IST

अलीकडे एका ज्वेलरी ब्रँडची एक जाहिरात प्रसारित झाली आणि या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटले. कंगनानेही या वादात उडी घेतली.

ठळक मुद्देएका ज्वेलरी ब्रँडची नवी जाहिरात सध्या वादात सापडली आहे.

अलीकडे एका ज्वेलरी ब्रँडची एक जाहिरात प्रसारित झाली आणि या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही या वादात उडी घेतली. नेहमीप्रमाणे कंगनाने या वादावर अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली.

हे क्रिएटीव्ह दहशतवादी...

प्रत्येक मुद्यावर परखडपणे मत मांडणा-या कंगनाने या जाहिरातीवर जोरदार टीका केली. ‘हे क्रिएटीव्ह दहशतवादी आपल्या अचेतन मनात काय काय भरत आहेत, याबद्दल हिंदू या नात्याने आपण सर्वांनी सतर्क राहायला हवे. आपल्या डोक्यात जे काही भरवले जातेय, त्याचा आपल्यावर काय परिणाम संभवतो, याचा योग्य विचार करणे गरजेचे आहे. आपली सभ्यता वाचवण्याचा हाच एक मार्ग आहे,’ असे  ट्विट कंगनाने केले.

लव्ह जिहादलाच नाही तर लिंगभेदाला प्रोत्साहन...

या जाहिरातीवर तीव्र शब्दांत टीका करताना अन्य एका  ट्विटमध्ये कंगनाने लिहिले, ‘ही जाहिरात अनेकार्थाने चुकीची आहे. एक हिंदू सून अनेक दिवसांपासून कुटुंबासोबत राहते. मात्र घराला वारस देणार म्हटल्यावरच कुटुंब तिचा स्वीकार करते. ती काय फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन आहे? ही जाहिरात केवळ लव्ह जिहादलाच नाही तर लिंगभेदालाही प्रोत्साहन देते.’

काय आहे वाद...एका ज्वेलरी ब्रँडची नवी जाहिरात सध्या वादात सापडली आहे. अनेकांनी ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचे सांगत त्याचा विरोध केला आहे. तर काहींच्या मते, या जाहिरातीत केवळ हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारी आहे. हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच संबंधित ब्रँडने ही जाहिरात मागे घेतली आहे.

बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार...

 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कमालीच्या आक्रमक झालेल्या आणि बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि ड्र्रग्स रॅकेटवर टीका करणाऱ्या कंगना राणौत हिने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्री ही ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली आहे.एकापाठोपाठ एक ट्विट करत कंगानाने बॉलिवूडवर हल्लाबोल केला आहे. बॉलिव़ूड ड्रग्स, शोषण, नोपोटिझम आणि जिहादचे गटार बनले आहे. मात्र त्याला साफ करण्याऐवजी बॉलिवूड स्ट्राइक्स बॅकसारख्या हॅशटॅगचा वापर केला जात आहे. मी तर म्हणते माझ्यावरही खटला दाखल करा. जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचं पितळ उघडं पाडत राहीन, असे कंगना म्हणाली.

 बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,  कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार

 कंगनाचे पुन्हा टीकास्त्र, वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेअर केला राऊतांचा 'तो' फोटो

टॅग्स :कंगना राणौत