Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौत ‘फोर्ब्स’वर रूसली, बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:34 IST

फोर्ब्स इंडियाने नुकतीच यंदा सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीवरूनही रंगोली उखडली होती.

ठळक मुद्दे यंदाच्या फोर्ब्सच्या टॉप 100 सेलेब्सच्या यादीत कंगना 70 व्या क्रमांकावर असून तिची 2019 मधील कमाई 17.05 करोड रुपये असल्याचे म्हटले आहे.  

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मुद्दा कुठलाही असो, कंगना कायम परखड मत मांडतांना दिसते. नुकतेच कंगनाने फोर्ब्स इंडियाने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणा-या  टॉप 100 कलाकारांच्या यादीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  कंगनाने तिचे त्या यादीत दिलेले कमाईचे आकडे चुकीचे असल्याचा दावा केला होता. कंगनाच्या वतीने बोलणारी तिची बहीण रंगोली हिने ट्वीट करत,फोर्ब्सची यादी फ्रॉड असल्याचे म्हटले होते. आता रंगोलीने फोर्ब्सला कायदेशीर नोटीस धाडली आहे.

फोर्ब्स इंडियाने नुकतीच यंदा सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीवरूनही रंगोली उखडली होती. ही यादी म्हणजे, एक नंबरचा फ्रॉड आहे, असे तिने ट्विटरवर लिहिले होते. केवळ इतकेच नाही तर उत्पन्न सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हानही दिले होते.

‘हे फोर्ब्स इंडिया एक नंबर फ्रॉड आहे. मी जाहीरपणे त्यांना एका तरी सेलिब्रिटीचे यादीत दिलेले उत्पन्न सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देते. सगळा पीआरचा खेळ आहे. या यादीतील कंगनाच्या उत्पन्नाच्या आकड्यापेक्षा अधिक ती टॅक्स भरते. कुणी किती टॅक्स भरला, ते यांनी सांगावे. तुम्ही कोणत्या आधारावर लोकांच्या कमाईचा अंदाज बांधता? खुद्द कंगनालाही तिने यावर्षी किती पैसे कमावले हे ठाऊक नाही. केवळ तिचे अकाऊंट डिपार्टमेंट आणि मला याबद्दल ठाऊक आहे. सेलिब्रिटींच्या उत्पन्नाचे आकडे गोपनीय ठेवले जातात आणि यांच्याजवळ म्हणे, संपूर्ण इंडस्ट्रीचे अकाऊंट आहे, ’असे तिने लिहिले होते.

 आता रंगोलीने फोर्ब्सला कायदेशीर नोटीस धाडली आहे. रंगोलीने स्वत: ही माहिती दिली. फोर्ब्स इंडियाला आमच्या टीमने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अद्याप फोर्ब्सने उत्तर दिलेले नाही. तुमचा सोर्स काय ते सांगा.  कंगनाच्या उत्पन्नाचा आकडा तुम्हाला कळलाच कसा? असे रंगोलीने या नोटीसचा फोटो शेअर करत लिहिले आहे. यंदाच्या फोर्ब्सच्या टॉप 100 सेलेब्सच्या यादीत कंगना 70 व्या क्रमांकावर असून तिची 2019 मधील कमाई 17.05 करोड रुपये असल्याचे म्हटले आहे.  

 

टॅग्स :कंगना राणौत