Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी 34 वर्षांची सुपर ह्युमन...! वाढदिवशी कंगना राणौतने लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 11:59 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिचा आज वाढदिवस. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आज 34 वा वाढदिवस साजरा करतेय.

ठळक मुद्देकालच कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिचा आज वाढदिवस. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आज 34 वा वाढदिवस साजरा करतेय. कालच कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात कंगनाने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.जणू मी असामान्य क्षमता असलेली सुपरह्युमन असल्याचे मला वाटतेय, असे तिने ट्विटरवर स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले आहे.

कंगनाची पोस्ट...

 महिलांचे एक वय असते, असे लोक म्हणायचे. हे जग केवळ बिनडोक गोड 16 टाईप मुलींना महत्त्व देते. समजुतदार व बुद्धिमान महिला केवळ एखाद्या पुरूषाचे घर सांभाळू शकतात. ते अशा अनेक गोष्टी बोलायचे आणि त्या गोष्टी मला त्रास द्यायच्या. माझे काय होणार, मी कुठे जाऊ? असे प्रश्न मला पडायचे.

आज मी 34 वर्षांची झालेय. वयाच्या 34 व्या वर्षी मी करिअरच्या शिखरावर असेन, हे त्यांनी मला कधीच सांगितले नाहे. मला माझ्या कलेमुळे लोकप्रियता मिळेल, माझे अनुभव महत्त्वाचे ठरतील आणि माझे वय वा माझी वैवाहिक स्थिती याला काहीही महत्त्व उरणार नाही, हे त्यांनी कधीच सांगितले नाही. आज मी असामान्य शक्ती असलेली सुपर ह्युमन आहे, असे मला वाटतेय. मी जाड आहे की सडपातळ याने मला काहीही फरक पडत नाही. मादक दिसणे मला आवडते आणि माझ्या सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल मी सहज आहे. पिंपल्स वा पीरियड्सबद्दल मला काहीही तक्रार नाही. मी वाईट आहे, असे मला भासवण्याची आज कोणाचीही हिंमत नाही. मी सर्व मुलींना सांगू इच्छिते की, 34 व्या वर्षी मी आनंदी आहे आणि जग सुंदर भासतेय. मला जन्म देणाºया आईचे आभार..., असे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :कंगना राणौत