Join us
Daily Top 2Weekly Top 5

 कंगना राणौतला मिळाली होती सुशांतसोबत काम करण्याची संधी, मग का दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 14:33 IST

कारण वाचून बसेल धक्का

ठळक मुद्देतर गोष्ट आहे 2017ची. यावर्षी फिल्ममेकर होमी अदजानिया हे कंगना व सुशांतला एका रोमॅन्टिक चित्रपटासाठी साईन करू इच्छित होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना राणौत खुलेआम नेपोटिजमवर बोलत आहे. कंगनाने आता एक नवा खुलासा केला आहे. होय, कंगनाला एकदा सुशांतसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण कंगनाने तेव्हा ही ऑफर नाकारली होती. का? तर त्याचाच खुलासा तिने इतक्या वर्षांनंतर केला आहे.तर गोष्ट आहे 2017ची. यावर्षी फिल्ममेकर होमी अदजानिया हे कंगना व सुशांतला एका रोमॅन्टिक चित्रपटासाठी साईन करू इच्छित होते. होमी यांनी मोठ्या अपेक्षेने कंगनाला याबद्दल विचारणा केली होती. पण कंगनाने  त्यांची ही ऑफर नाकारली. कारण होते हृतिक रोशन.

कंगनाने सांगितले, ‘मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा होमीने मला त्यांच्या ऑफिसात भेटायला बोलावले होते. त्यांना मी भेटायला जाणारच होते तितक्यात हृतिक रोशनने मला कायदेशीर नोटीस पाठवली. तरीही मी त्यांना भेटायला गेले. घाबरलेल्या अवस्थेत मी होमीकडे गेली. त्यांनी मला त्यांच्या आगमी चित्रपटाची कथा ऐकवली. पण त्यांच्या बोलण्याकडे माझे जराही लक्ष नव्हते. कारण त्या मनातून अस्वस्थ होते.

त्यावेळी मी प्रचंड निराश होते. मी पुन्हा येईल, असे म्हणून मी त्यावेळी होमीचा निरोप घेतला होता.  पण त्यावेळी माझ्या मानसिक स्थितीबद्दल कोणालाच माहिती नव्हते. त्यानंतर एक वर्षभर मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मी त्यावर्षी कोणताच चित्रपट साइन केला नाही. पण होमीने ऐकवलेल्या त्या चित्रपटाची कथा आजही लक्षात आहे. ती एक शहरातील जोडप्याची लव्हस्टोरी होती. आता जे काही झाले त्यानंतर मला असे वाटले की, जर मी त्या चित्रपटात सुशांतसोबत काम केले असते तर आमचे आयुष्य बदलले असते? मला माहित नाही. पण अनेक बाबतीत हे दुर्दैवी आहे.’

टॅग्स :कंगना राणौतसुशांत सिंग रजपूत