Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 13:06 IST

आपल्या परखड विधानांसाठी चर्चेत राहणारी कंगना राणौत हिने आता फटाके बंदीच्या मुद्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

 आपल्या परखड विधानांसाठी चर्चेत राहणारी कंगना राणौत हिने आता फटाके बंदीच्या मुद्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भातील तिचे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होतेय.  शहजाद पूनावालाचे एक ट्विट शेअर करत, कंगनाने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘चला, दिवाळी फटाकेमुक्त बनवू, नाताळला झाडांची कत्तल थांबवू, ईदला प्राण्याचे बळी थांबवू. सर्व जागृत लिबरल्स माझ्याशी सहमत आहेत का? नाही तर तुम्हाला काय हवे, हे ओळखणे सोपे आहे मात्र तुम्हाला काय आणि कसे हवे, हे स्पष्ट नाही. तुमच्या काळ्या इच्छांमागे काय कारण आहे, हे स्वत:च स्वत:ला विचारा,’ असे उपरोधिक ट्विट कंगनाने केले आहे.

 तर ब्लॉक करा...बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. मुद्दा कुठलाही असो. अगदी देशाच्या कोप-यात साधे खट् झाले तरी कंगनाची टिवटिव सुुरू होते. कंगनाची ही टिवटिव काही लोकांना आवडते तर काही लोकांचा यामुळे संताप होतो. अनेकजण तिला गप्प बसण्याचा सल्ला देतात. पण हा सल्ला इतक्या सहजी मानणा-यांपैकी कंगना नाही. अलीकडे  गप्प बस म्हणणा-यांनाच कंगनाने सल्ला दिला होता.

‘ ते चाहते जे दिवसभर माझे ट्विट चेक करतात आणि माझ्या गोष्टींमुळे कंटाळल्याचे सांगून मला गप्प बसण्याचा सल्ला देतात, त्यांनी मला ब्लॉक करावे. तुम्ही मला ब्लॉक करत नसाल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्ही माझ्यावर फिदा आहात. द्वेष करणा-या व्यक्तिसारखे माझ्यावर प्रेम करू नका. यापेक्षा चांगला मार्ग मिळत नसेल तर फक्त प्रेम करा,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.

कंगनाने भावाच्या लग्नात खर्च केले इतके कोटी रुपये, आकडा पाहून उडेल तुमची झोप

SEE PICS : कंगना राणौतच्या भावाच्या लग्नाचा थाट, असे केले नव्या सुनेचे स्वागत

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘थलायवी’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यानंतर ‘तेजस’ या सिनेमात तिची वर्णी लागली आहे. येत्या डिसेंबरमध्ये कंगना या सिनेमाचे शूटींग सुरु करणार आहे. याशिवाय ‘धाकड’ हा सिनेमा तिने साईन केला आहे. यात कंगना अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत