Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...

By अमित इंगोले | Updated: October 1, 2020 09:45 IST

अभिनेत्री कंगना रणौत तर लॉकडाऊनपासून तिचं होमटाऊन मनालीमध्येच होती. आता ती सुद्धा साऊथ इंडियाकडे निघाली आहे.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आता अनेक कलाकार आपापल्या शूटींगवर परतले आहेत किंवा काही कलाकार सुट्टी एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री कंगना रणौत तर लॉकडाऊनपासून तिचं होमटाऊन मनालीमध्येच होती. आता ती सुद्धा साऊथ इंडियाकडे निघाली आहे.

कंगना रणौतने स्वत: ट्विट करून ती साऊथ इंडियात जात असल्याची माहिती दिली. कंगनाने ट्विट करून लिहिले की, 'माझ्या प्रिय मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे. साधारण ७ महिन्यांनंतर मी माझ्या कामावर परतत आहे आणि आपल्या सर्वात महत्वाकांक्षी दोन भाषेत तयार होत असलेल्या 'थलायवी'साठी साऊथकडे रवाना होत आहे. महामारीच्या या काळात तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. हा सेल्फी आज सकाळीच काढलाय, आशा आहे तुम्हाला आवडला असेल'. आपल्या या सेल्फीत कंगना फारच आनंदी दिसत आहे.

दरम्यान कंगनाने 'थलायवी' सिनेमासाठी करत असलेल्या डान्स रिहर्सलची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. कंगना रणौत आणि कोरिओग्राफरने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहूनही वाटतं की, कंगना पुन्हा काम सुरू केल्याने आनंदी आणि उत्सुक आहे.

कंगनाचा हा सिनेमा तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याची स्क्रीप्ट बाहुबलीचे आणि मणिकर्णिकाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. आधी हा सिनेमा २६ जून २०२० रोजी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड