Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छोटा बच्चा बन गया गँगस्टर', कंगना राणौतने आलिया भट आणि 'गंगूबाई काठियावाडी'ची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 16:55 IST

कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी वादात अडकलेली असते. आता कंगनाने आलिया भटचा आगामी सिनेमा  'गंगूबाई काठियावाडी'वर निशाणा साधला आहे. 

कोरोना व्हायरसच्या  'थलायवी' डिजिटल प्लेटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल या रिपोर्टवर कंगना राणौत आपली प्रतिक्रिया देत होती. ही बातमी खोटी असल्याचे कंगना म्हणाली. आपल्या इन्स्टास्टोरीवर कंगना लिहिले,  "थलाईवीचे डिजिटल हक्क अ‍ॅमेझॉन (तमिळ) आणि नेटफ्लिक्स (हिंदी) कडे आहेत."

कंगनाने पुढे लिहिलं, "थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी  डिजिटल प्लेटफॉर्मवर हा सिनेमा स्ट्रीम करु शकत नाही . बनावट प्रचार करण्याऱ्या माध्यमांवर मीडियावर कठोर कारवाई केली जाईल."

यानंतर कंगनाने 'गंगूबाई काठियावाडी' आलियाच्या अ‍ॅक्टिंगवरही टोला लगावला आहे. तिने लिहिले, "बिकाऊ मीडियाने एका चित्रपटाविषयी लिहिले ज्याच्या ट्रेलरवर जोरदार टीका केली गेली होती आणि वाईट अभिनयाबद्दल  खिल्ली उडवली गेली होती आणि एका लहान मुलीला गँगस्टर म्हणून कास्ट केले आणि आता तो डिजिटल प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. '' 

कंगनाने पुढे लिहिले की, "डिजिटल व्यासपीठावर ज्या चित्रपटाला कडक शब्दात टीका केली गेली आहे त्याबद्दल लिहा कारण चित्रपटाची चूक असल्याचे तपासले गेले आहे, याची सत्यता तपासली जाते, त्याबद्दल मी आणखी बातम्या पाहिल्या." कंगनापूर्वी तिची बहीण रांगोळी चंदेलने एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला होता ज्यामध्ये गंगूबाई कथियाबारी संजय लीला भन्साळी यांनी ओटीटीच्या रिलीजसाठी सांगितली जात होती.

'थलायवी'मध्ये  जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमासाठी कंगनाला वजन वाढवावे लागले होते. विशेष म्हणजे, एकदा वजन वाढवून तिला पुन्हा स्लीमट्रीम व्हायचे होते. काही महिन्यात 20 किलो वजन वाढवणे आणि पुन्हा ते घटवणे हे आव्हान कंगनाने स्वीकारले होते.

टॅग्स :कंगना राणौत