Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह येताच कंगना राणौतने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाली स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 12:05 IST

कंगनाने तिचा कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह आल्याचे सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितले होती.

काही दिवसांपूर्वीच कंगणा राणौतने कोरोनावर मात केली होती. तिचा कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह आल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितले होते. 8 मे रोजी कंगनाला कोरोना लागण झाली होती. त्यानंतर तिने स्वत:ला होम क्वारांटाईन केले होतं. आता कंगना कोरोनातून बरी झाली आहे आणि आपल्या मनालीतल्या घरी रवाना झाली आहे. तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगना बर्‍याचदा तिच्या बेडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाने फोटोग्राफरना एक मजेशीर प्रश्न विचारला. 

विरल भयानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये कंगना आपल्या कारमधून खाली उतरत विमानतळाकडे जाते होती. यादरम्यान कंगना साडी आणि काळा चष्मा लावलेला दिसला. यावेळी, जेव्हा पापाराझी तिला तिच्या आरोग्याबद्दल विचारते तेव्हा ती म्हणते की ती ठीक आहे आणि ती विचारते कोणा-कोणाला कोरोना झाला आहे' आणि कुणी कुणी व्हॅक्सिन घेतले आहे.

कोरोनातून बरं झाल्यावर कंगना सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.या पोस्टमध्ये ती म्हणाली होती, तुमच्या सगळ्याचे प्रेम आणि आशिर्वादामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. मी कोरोनाला कशारितीन हरवू शकले याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखवायचे नाही म्हणत पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. जर आपण विषाणूबद्दल काही अनादर दाखवला तर काही लोक खरोखरच दुखावले जातात. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. " 

टॅग्स :कंगना राणौत