Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धाकड'चे दमदार पोस्टर आऊट, बॉलिवूडची ही Controversy क्वीन करणार अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 12:54 IST

'धाकड' या अॅक्शन थ्रीलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश रेजी घई करणार आहेत

ठळक मुद्देपुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल

धाकड या अॅक्शन थ्रीलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश रेजी घई करणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री कंगना राणौत अॅक्शन करताना दिसणार आहेत. 

कंगना सांगितले की, मणिकर्णिकाच्या यशानंतर रसिकांनी ही दाखवून दिल आहे की, त्यांना फिमेल हिरोवाले सिनेमा पाहायला आवडतात. धाकड सिनेमा केवळ माझ्या करिअरचा फक्त बेंचमार्क सिनेमा नसून इंडियन सिनेमासाठी सुद्धा टर्निंग पाईंट ठरणार आहे. हा सिनेमा बिग कॅनवासवर तयार करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जर हा सिनेमा हिट झाला तर भारतीय सिनेमामध्ये महिला कधीच मागं वळून पाहणार नाहीत.   

या सिनेमाचे भारताशिवाय साईथ इस्ट एशिया, मिडिल इस्ट आणि युरोमध्ये होणार आहे. 2020च्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

गेल्या काही दिवसांपासून कंगनाचा ‘जजमेंटल है क्या' सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव दिसणार आहे. सिनेमात दुहेरी हत्याकांड दाखवण्यात आले आहे. या खुनाची चौकशी पोलीस करत असतात. अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर बॉबी (कंगना राणौत) आणि केशव (राजकुमार राव) या दोघांपैकी एकाने खून केल्याच्या निर्णयापर्यंत पोलिस पोहोचतात. आपल्या चित्र- विचीत्र वागण्यामुळे संकटात अडकलेल्या कंगनापुढे पोलिस  दोन पर्याय ठेवतात. एक तर २० हजार रुपयांचा दंड भर किंवा मेंटल हॉस्पीटलमध्ये जा, असे हे दोन पर्याय. यावर कंगना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पर्याय निवडते. तिकडे राहत असतानाच ती राजकुमारकडे आकर्षित होते. पण याचदरम्यान  राजकुमारनेच खून केला असून यात आपण नाहक फसत असल्याचे तिला कळते. अखेर कंगना आणि राजकुमार एकमेकांविरुद्ध उभे राहतात. 

टॅग्स :कंगना राणौत