Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगणा राणौतला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता, पुन्हा झाली सोशल मीडियावर व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:41 IST

कंगणा राणौतचे सोशल मीडिया अकाऊंट ही तिची बहीण रंगोला चंडेल मॅनेज करत होती.

बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे  बॉलिवूड क्वीन कंगाणा राणावत  चर्चेत असते. आता बॉलीवुडमध्ये होणाऱ्या  घराणेशाहीवरही कंगणाने परखड मत मांडलं आहे. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमध्ये सुरू असणारी घराणेशाही जबाबदार असल्याचे तिने म्हटले आहे. दिवसेंदिवस कंगणा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत मांडत आहे. नेहमी परखड मत मांडणारी कंगणाला आता एका गोष्टीची भीती सतावत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर पुन्हा तिने एक पोस्ट केली आहे. या  पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, कोणत्याही क्षणी माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करू शकतात. माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्यातून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. माझ्याकडे असलेला वेळ आहे त्याचा अधिक उपयोग मी त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी करेन.

कंगणा राणौतचे सोशल मीडिया अकाऊंट ही तिची बहीण रंगोला चंडेल मॅनेज करत होती. मात्र रंगोलीचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर  आता टिम कंगना रणौत हे अकाऊंटही सस्पेंड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. 

मध्यंतरी बॉलिवूडच्या अनेक गोष्टी पर्दाफाश करताना कंगनाचे आयुष्य आणि करिअर अजूनही धोक्यात आहे. असे असूनही ती याबद्दल बोलू शकत नाही. का? उत्तर द्या’ असे एक ट्वीटकंगनाच्या टीमने केले होते. कंगनाच्या टीमने केलेल्या या पोस्ट सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी कंगनाला पाठींबा दिला आहे. ‘आम्ही तुझ्या सोबत असताना तुझे करिअर आणि तुझ्या जीवाला काहीही होणार नाही,’ असे लिहित युजर्सने तिला धीर दिला होता.

टॅग्स :कंगना राणौत