Join us
Daily Top 2Weekly Top 5

 फाटक्या जीन्सवर कंगना राणौतने पाजळले ज्ञान; म्हणाली, भिकारी दिसणार नाही याची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 11:20 IST

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तीरथ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मग कंगना राणौत का मागे राहणार?

ठळक मुद्देउत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल विधान केले होते

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर सोशल मीडियावर#RippedJeans ट्रेंड करतोय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या विधानाची तीव्र निंदा होतेय. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तीरथ यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मग कंगना राणौत का मागे राहणार? आता तिनेही यावर ट्विट केले आहे. पण फाटक्या जीन्सबद्दल बोलतानाही कंगना स्वत:ची तारीफ करतानाच दिसली.

कंगनाने स्वत:चे काही फोटो ट्विटरवर पोस्ट केलेत. यात ती रिप्ड जीन्समध्ये दिसतेय. याफोटोंसोबत तिने लिहिले,‘रिप्ड जीन्स घालणार असाल तर या फोटोंइतका कूलनेस असू द्या. जेणेकरून तुम्ही स्टायलिश दिसाल, नाहीतर बेघर भिकारी दिसाल. आजकालचे तरूण असेच दिसतात.’

झाली ट्रोलफाटक्या जीन्सबद्दलही कंगनाने तत्त्वज्ञान दिलेले पाहून अनेक युजर्सनी कंगनाला ट्रोल केले. बहन, इसमें भी बोल पडी, असे एका युजरने लिहिले. ‘पद्मश्री कंगना राणौतने म्हटले ना, मग आजपासून नो रिप्ड जीन्स...,’ अशी उपरोधिक कमेंट अन्य एका युजरने केली. एका युजरने यापुढे जात कंगनाला फैलावर घेतले. ‘कपड्यांवरून धर्म सांगणारे आता फाटक्या जीन्सवरून गरीब-श्रीमंत, बेघर हेही सांगणार का?,’ असे या युजरने लिहिले.

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल विधान केले होते. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असे ते म्हणाले होते.  त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. जया बच्चन, उर्मिला मातोंडकर,  गुल पनाग आदींनी त्यांच्या या विधानाची निंदा केली आहे.

टॅग्स :कंगना राणौत