Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर...

By अमित इंगोले | Updated: November 7, 2020 12:06 IST

ऑक्टोबर महिन्यात कंगनाववर तुमकुर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे.

कंगना रणौत भलेही गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असेल, पण नुकतीच तिच्यासाठी एक शाही दावत अरेंज करण्यात आली होती. तिची मोठी बहीण आणि मॅनेजर रंगोलीने या शाही दावतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही पार्टी नालागढचे महाराज विजयेंद्र सिंह यांनी अरेंज केली होती. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात कंगनाववर तुमकुर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे.

मनालीमध्ये सध्या काडक्याची थंडी पडत आहे. ज्याचा नजारा या फोटोत बघायला मिळतो. कडाक्याच्या थंडीत सगळेजण शेकोटीजवळ बसले आहेत. सोबतच सर्वांच्या हाती ड्रिंकही आहेत. कंगनाने डिनरआधी तिचे फोटो शेअर केले होते. याच्या कॅप्शनला तिने लिहिले होते की, आयुष्यात काहीही झालं तर, एक लक्षात ठेवायचं...स्टाइलमध्ये रहायचं. भीडू अॅटिट्यूड. तसेच काही दिवसांपूर्वी कंगना रणौत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या घरी भावाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी गेली होती. 

दरम्यान, वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर कंगनाकडे सध्या 'तेजस', 'धाकड' आणि 'थलायवी'सारखे तीन मोठे सिनेमे आहेत. या सिनेमाचं काही शूटींग झालं तर काही भावाच्या लग्नानंतर पूर्ण करणार आहे. तसेच १० नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तिला मुंबई पोलिसांनी समन्सही पाठवला आहे. आता ती कधी चौकशीसाठी हजर राहिल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडहिमाचल प्रदेश