Join us

ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:12 AM

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचे चित्रपट चाहत्यांना खूप आवडतात. येत्या 20 मे रोजी ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे. यासोबतचत अभिनेत्याचा 'देवरा : पार्ट 1' (Devara Part 1) हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातच  ज्युनियर एनटीआरने आंध्र प्रदेशातील एक मंदिराला रक्कम दान केली आहे. ही रक्कम किती आहे, याचा खुलासा झाला आहे. 

ज्युनियर एनटीआरने आंध्र प्रदेशातील चेयेरू येथील श्री भद्रकाली समिती वीरभद्र स्वामी मंदिराला 12.5 लाख रुपये दान केले. अभिनेत्याच्या एका फॅन पेजने ही माहिती शेअर केली आहे. यामुळे चाहते ज्युनियर एनटीआरचं कौतुक करत आहेत. दानधर्म करण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. ज्युनियर एनटीआर लोकांच्या सेवेसाठीही  कायम तत्पर असतो. तो नेहमीच उदात्त कार्यांसाठी योगदान देतो. यापुर्वीही ज्युनियर एनटीआरनं इतर अनेक चांगली कामे केली आहेत. यापूर्वी त्याने दानधर्म करून पूरग्रस्तांना मदत केली होती. यासाठी त्यानं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपयांचे योगदान दिले होते.

ज्युनियर एनटीआर 'देवरा पार्ट 1'मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. एसएस राजामौली यांच्या २०२२ मध्ये आलेल्या 'आरआरआर'नंतर हा अभिनेता कोणत्याही चित्रपटात दिसला नव्हता.  'देवरा: भाग 1' हा ज्युनियर एनटीआरचा बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील पहिले गाणे 'भय गाणे' हे काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. येत्या 10 ऑक्टोबर 2024 रोजी हे ॲक्शन-पॅक्ड ड्रामा देशभरात रिलीज होणार आहे.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरTollywoodसेलिब्रिटीसिनेमाजान्हवी कपूर