अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करतेय. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आणि स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात. लवकरच दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. काल जान्हीचा वाढदिवस होता. तर तिच्यासाठी शिखरनं खास पोस्ट शेअर केली होती.
शिखरने जान्हवी कपूरसोबतचा खास फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील दोघांची जोडी आवडते. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा जान्हवीच्या कुटुंबीयांनादेखील आवडतो. जान्हवीचे वडील यांनी देखील शिखर – जान्हवी यांच्या नात्याला होकार दिला आहे. माहितीनुसार २०२५ सालाच्या शेवटपर्यंत शिखर आणि जान्हवी एकमेकांशी लग्न करू शकतात. या लग्नसोहळ्याची मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शिखरसोबतच त्याचा धाकटा भाऊ आणि अभिनेता वीर पाहाडिया यानेदेखील खास पोस्ट करत जान्हीवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वीरलाही जान्हवी ही वहिणी म्हणून पसंत आहे. दोघेही खास बॉन्डिंग शेअर करतात.
जान्हवीच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच "परम सुंदरी"सिनेमातून चाहत्यांत्या भेटीस येणार आहे. सिनेमात जान्हवी अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्यासोबत दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.