Join us

Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’मधल्या जग्गूने मानले प्रेक्षकांचं आभार, म्हणाला- उदंड प्रतिसाद देणाऱ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:27 IST

‘जग्गू आणि जुलिएट’मधील अमेय वाघ आणि वैदही परशुरामीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे.

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला, आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही पडताना दिसत आहे. अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असलेल्या या चित्रपटातील सगळीच गाणी अगदी हटके आहेत. अलिकडेच झालेल्या Valentine’s Day निमित्त प्रेक्षकांनी या सिनेमाला उदंड प्रतिसाद देखील दिला. 

अमेय-वैदेहीसोबतच ऋषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे. 

अमेय अलिकडेच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये चित्रपटाची टीम अचानक शोसुरु असताना थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना सरप्राईज दिलं होतं. यावेळी चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल झालेला दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करताना अमेयने लिहिले होते, Valentine’s Day निमित्त “जग्गु आणि Juliet” ला उदंड प्रतिसाद देणाऱ्या मराठी प्रेक्षकांना खूप खूप प्रेम !

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित झाली आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गु आणि जुलिएट’ला प्रेक्षकांची देखील पसंती मिळताना दिसतेय!

टॅग्स :अमेय वाघवैदेही परशुरामी