Join us

जॅकलिन फर्नांडिसने अशा पद्धतीने केले 'लवयात्री' सिनेमाचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:44 IST

सलमान खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट 'लवयात्री' ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

ठळक मुद्दे 'लवयात्री' ५ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित 'लवयात्री'मधील 'चोगडा' या गाण्यावर नृत्य करून जॅकलिनने केले प्रमोशन

सलमान खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट 'लवयात्री' ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटामध्ये आयुष शर्मा आणि वरीना हुसेन मुख्य भूमिकेत आहेत. आपल्या मेहुण्याला प्रमोट करण्याची कोणतीच संधी सलमान खान सोडत नाही. त्याला आता जॅकलीन फर्नांडीसची साथ लाभली आहे. जॅकलीनने 'लवयात्री' चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियावर केले आहे.

जॅकलीनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना 'लवयात्री' चित्रपटातील 'चोगडा' या गाण्यावर नृत्य केले आहे. यामध्ये तिच्या सोबत अन्य दोन डान्सर देखील आहेत. या गाण्यावर नृत्य करून तिने एकप्रकारे हा चित्रपट प्रमोटच केला आहे.

‘लवयात्री’ चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या रंगतारी या गाण्याने हॉलीवूड गायक कान्या वेस्ट आणि मारून यांना पिछाडीवर टाकत यूट्यूबवर 24 तासांच्या आत सर्वाधिक पाहिले गेलेल्या गाण्याचा किताब आपल्या नावे केला आहे. याबाबतची घोषणा करताना संगीत निर्माता, गायक, संगीतकार आणि रॅपरने लिहिले की, 'जगातील पहिल्या नंबरचे गाणे हे “लवयात्री’मधील रंगतारी हे आहे. या यशाबद्‌दल आनंद व्यक्‍त करत हनी सिंग म्हणाला की, ही बाब माझ्यासाठी निश्‍चित कौतुकास्पद आहे. मी केलेल्या परिश्रमाला यश मिळाल्याने मी समाधानी आहे.'

'लवयात्री' या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. त्यामुळे खान फॅमिलीसाठी येता शुक्रवार  महत्त्वपूर्ण असणार आहे. आयुष शर्मासोबतचवरिना हुसैन हिचा सुद्धा हा पहिला चित्रपट आहे. डेब्यू सिनेमा असल्याने तिच्यासाठीही हा शुक्रवार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अभिराज मीनावाला दिग्दर्शित हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. सुश्रूत व मिशेल हे दोघे नवरात्रीत भेटतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण नवरात्रोत्सव संपताच मिशेल लंडनला परत जाते. मिशेलला मिळवण्यासाठी सुश्रूत कुठल्या दिव्यातून जातो, अशी 'लवयात्री'ची कथा आहे. 

टॅग्स :लवरात्रिजॅकलिन फर्नांडिससलमान खान