Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ते शब्दांत नाही सांगू शकत..!', किरण मानेंनी अभिमान साठेंची भूमिकेबाबत व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:21 IST

kiran Mane : सध्या किरण माने कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची या मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान आता त्यांनी मालिकेसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता किरण माने (kiran Mane) यांना कोणत्याच परिचयाची गरज नाही. ते टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते बऱ्याचदा बेधडक विधानांमुळे चर्चेत येत असतात. सध्या ते कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची या मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान आता त्यांनी मालिकेसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर सिंधुताई सपकाळ पाहायला मिळत आहेत. यात सिंधुताई बोलताना दिसत आहेत की, आईने कधीच वेगळे केले नाही पण प्रेमही केले नाही. मी नको होते म्हणून माझे नाव चिंधी ठेवले होते.  कपडे फाटल्यानंतर त्याची चिंधी होते. मग ते फेकून टाकतो. पण माझ्या वडिलांचे नाव अभिमान होते. मला त्यांचा अभिमान वाटायचा. माझी आई माझ्याबद्दल वाईट विचार करायची आणि वडील चांगला विचार करायचे. पण आई खूप उशीरा देवाघरी गेली. मात्र माझ्यावर प्रेम करणारे वडील लवकर देवाघरी गेले. या व्हिडीओसोबत किरण माने यांनी मालिकेतला एक सीन शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की,...सिंधुताईंसारख्या लेकीला आयुष्यभर 'अभिमान' वाटावा, असा बापमाणूस अभिमान साठे साकारताना रोज जे समाधान मिळतंय... ते शब्दांत नाही सांगू शकत ! कलर्स मराठी वाहिनीचे मनापास्नं आभार. ईश्वरा जन्म हा दिला...प्रसवली कला... थोर उपकार !

 सिंधु ताईंच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे उत्तर पद्धतीनं या मालिकेतून मांडण्यात येणार आहेत. चिंधीची भूमिका अनन्या टेकवडे साकारत आहे. तर किरण माने मालिकेत अभिमान साठे म्हणजेच चिंधीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.
टॅग्स :किरण माने