Join us  

Video: ईशान खट्टरच्या गर्लफ्रेंडवर खिळल्या नजरा, 'मलेशियन ब्युटी'ची होतेय जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:55 AM

ईशान त्याच्या गर्लफ्रेंडसह स्क्रीनिंगला पोहोचला होता.

शाहीद कपूरचा 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि शाहीद कपूरची (Shahid Kapoor) रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. काल बॉलिवूड स्टारकास्टसह सिनेमाची स्क्रीनिंग पार पडली. यावेळी शाहीदपेक्षा जास्त तर त्याचा भाऊ ईशान खट्टरलाच (Ishan Khatter)प्रसिद्धी मिळाली. ईशान त्याच्या गर्लफ्रेंडसह स्क्रीनिंगला पोहोचला होता. सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. 

अमित जोशी आणि आराधना शाह यांनी दिग्दर्शित केलेला 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' रोमँटिक कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. काल मुंबईत पार पडलेल्या स्क्रीनिंगसाठी शाहीद कपूर, क्रिती सेनन शिवाय डिंपल कपाडिया. धर्मेंद्र यांचीही भूमिका आहे. यावेळी शाहीद कपूरची आई नीलिमा अजीम, बायको मीरा राजपूत, भाऊ ईशान खट्टरही स्क्रीनिंगला आले. तर ईशान खट्टरची गर्लफ्रेंड चांदनी बेन्जला पाहून फोटोग्राफर्सच्या नजराही तिच्यावर खिळल्या. बॉटल ग्रीन रंगाच्या वनपीसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी ईशानने आई आणि गर्लफ्रेंडचा हातात हात पकडत फोटोग्राफर्सला पोज दिली. चांदनी बेन्ज चं सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या स्क्रीनिंगसाठी जान्हवी कपूर, कुणाल खेमू, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी, क्रितीची बहीण नुपूर सेननही दिसली. मात्र ईशानची गर्लफ्रेंड चांदनीनेच काल लाईमलाईट लुटलं. अनन्या पांडे, जान्हवी कपूरशी ब्रेकअपनंतर ईशान खट्टर चांदनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघंही अनेकदा डेटवर जातात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. चांदनी मलेशियन मॉडेल आहे. लॉकडाऊनमध्ये ती भारतात करिअरसाठी आली. भविष्यात चांदनीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करु शकते अशी चर्चा आहे. 

 

टॅग्स :इशान खट्टरशाहिद कपूरक्रिती सनॉनबॉलिवूडसिनेमा