ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याचं भारताबाबत असलेलं प्रेम काही लपलेलं नाही. डेव्हिड वॉर्नर लवकरच भारतीय फिल्म इंडस्ट्रीत आपला डेब्यू करतोय. तो लवकरच नितीनच्या 'रॉबिन हुड' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात तो एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. अशातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू एम. एस. धोनी याच्यादेखील चित्रपट डेब्यूच्या चर्चा रंगल्या आहेत.
धोनी हा राम चरणचा पुढील चित्रपट 'आरसी १६' मध्ये एक छोटीशी भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. बुची बाबू सना दिग्दर्शित या चित्रपटात धोनी राम चरणच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार, असही बोललं जातं होतं. पण, हे सत्य नाही. या निव्वळ अफवा आहेत. १२३ तेलुगूमधील एका वृत्तानुसार, चित्रपटात एका प्रशिक्षकाची भूमिका आहे, पण, ती भूमिका एमएस धोनी साकारत नाहीये.
'आरसी १६' मध्ये राम चरणसोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान चित्रपटातील गाणी संगीतबद्ध करत आहेत. याशिवाय 'मिर्झापूर' फेम दिव्येंदु, शिवा राजकुमार आणि जगपती बाबू हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वृद्धि सिनेमाजचे वेंकट सतीश किलारू करत आहेत.