Join us

मी गमावलं नाही तर मिळवलं... इरफान खानची पत्नी सुतापाची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 13:10 IST

सुतापा ही इरफानची प्रेरणा होती. इरफानवर कॅन्सरचे उपचार सुरु असताना सुतापा अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. 

ठळक मुद्दे सुतापा ही इरफानची मैत्रिण होती.

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानने 29 एप्रिलला जगाला अलविदा केले. त्याच्या निधनानंतर चाहते शोकाकुल झालेत. बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला. त्याच्या कुटुंबाच्या दु:खाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र इरफानची पत्नी सुतापा सिकदर मात्र खंबीर निघाली. होय, सुतापाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून ती एक खंबीर व्यक्ती आहे, हे संपूर्ण जगाला कळले.पती इरफानच्या निधनानंतर सुतापाने पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करुन दिली.

सुतापाने फेसबुक अकाऊंटवरचा डिस्प्ले फोटो बदलत, त्याठिकाणी इरफानसोबतचा स्वत:चा एक सुंदर फोटो टाकला आणि ‘मी काही गमावलं नाही तर अनेकार्थानं खूप काही मिळवलं आहे..., असे या फोटोसोबत लिहिले. या तिच्या एका ओळीच्या या पोस्टमधून सुतापाने बरेच काही सांगितले आहे.

सुतापा ही इरफानची प्रेरणा होती. इरफानवर कॅन्सरचे उपचार सुरु असताना सुतापा अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. मृत्यूच्या काही दिवस आधी इरफानने पत्नी सुतापाबद्दल भरभरून बोलला होता. संधी मिळाली तर मला तिच्यासाठी जगायचे आहे, असे तो म्हणाला होता. मी आजारी होतो. पण माझे कुटुंब 24 तास माझ्यासोबत होते. सुतापा तर सातही दिवस 24 तास माझ्या सेवेत होती. मी आत्ताही जिवंत आहे, याचे कारण फक्त ती आहे. मला परमेश्वराने जगण्याची संधी दिलीच तर मला फक्त तिच्यासाठीच जगायचे आहे.  या आजरपणाने मला माझ्या कुटुंबाच्या जवळ आणले, असे तो म्हणाला होता.

 सुतापा ही इरफानची मैत्रिण होती आणि त्याच्या कॉलेजपासून संघर्षांच्या काळ ते त्याचं आजारपण प्रत्येक वेळी ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिली. तो गेल्यानंतरही मुलांसाठी ती खंबीरपणे उभी राहणार, हेच तिच्या पोस्टमधून दिसतेय.

टॅग्स :इरफान खानबॉलिवूड