Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन आयडल १० मधील रेणूचे या कारणामुळे परीक्षकांनी बदलले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:00 IST

इंडियन आयडॉल १० मधील टॉप आठ स्पर्धकांनी नुकतेच दिवाळी विशेष भागासाठी चित्रीकरण केले. या चित्रीकरणाच्या वेळी त्या सगळ्यांनी खूप मौजमस्ती केली.

इंडियन आयडलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक हिट गाणी सादर करत आहेत. आता काहीच स्पर्धक बाकी असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. हे कलाकार स्पर्धकांना गाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात. 

इंडियन आयडॉल १० मधील टॉप आठ स्पर्धकांनी नुकतेच दिवाळी विशेष भागासाठी चित्रीकरण केले. या चित्रीकरणाच्या वेळी त्या सगळ्यांनी खूप मौजमस्ती केली. इंडियन आयडल या कार्यक्रमात नेहा कक्कर, विशाल दादलानी परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या भागात त्यांच्यासोबतच परीक्षकाच्या खुर्चीत जावेद अली असणार आहेत तर मंचावर रामदेव बाबा उपस्थित असणार आहेत. राजस्थानची रेणू नागर तिच्या कामगिरीने देशातल्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करत आहे आणि तिचे अनेक नवीन फॅन निर्माण झाले आहेत. रेणूने 'अली मोरे अंगना' या गाण्याचं या भागात अप्रतिम सादरीकरण करून परीक्षकांसमवेत जावेद अली आणि रामदेव या पाहुण्यांना देखील आश्चर्यचकित केले. विशाल दादलानी तर हे गाणे ऐकून खूपच प्रभावित आणि भावनाशील झाला होता. या गाण्याविषयी तो म्हणाला की, उषा ऊथुप यांनी रेणूची कामगिरी बघितली असता त्यांना नक्कीच आनंद होईल. 

जावेद अली तर रेणूचं गाणं ऐकून मंत्रमुग्ध होऊन म्हणाला, "मी हे गाणे ऐकून थक्क झालो आहे आणि यापुढे मी तुला 'नूर' हीच हाक मारणार आहे"

रेणूचे गाणे ऐकून विशाल म्हणाला, "रेणूची ही कामगिरी अफाट आहे आणि उषा ऊथुपना हे गाणं ऐकून नक्कीच आनंद झाला असता. खरंतर मी स्वतःच उषाजींना हे गाणं ऐकण्याची विनंती करेन... कारण त्यांच्या आवाजात एक 'रॉनेस' आहे आणि तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे."

इंडियन आयडॉल १० चा दिवाळी विशेष भाग प्रेक्षकांना या शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ८ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉल