Join us  

करण जोहरच्या आलिशान फ्लॅटमध्ये गर्लफ्रेंडसह राहणार हा अभिनेता, एका महिन्याचं भाडं तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 8:56 AM

४ वर्षांपूर्वीच अभिनेत्याने पत्नीला घटस्फोट दिला.

'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता इमरान खान (Imran Khan) आपल्या गर्लफ्रेंडमुळे सध्या चर्चेत आहे. पत्नीशी घटस्फोटानंतर तो लेखा वॉशिंग्टनला (Lekha Washington)  डेट करत आहे. बहीण आयरा खानच्या लग्नातही तो गर्लफ्रेंडसह पोहोचला तेव्हा सर्वांच्याच नजरा त्या दोघांकडे वळल्या. इमरान खानबद्दल आता नवी अपडेट समोर आली आहे. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत करण जोहरच्या (Karan Johar) फ्लॅटमध्ये भाड्याने राहणार आहे. या फ्लॅटचं भाडं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

इमरान खान आणि गर्लफ्रेंड लेखाने येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या फ्लॅटचा मालक करण जोहर आहे. फ्लॅटमधून सी व्ह्यू सुद्धा आहे. याआधी इथे आमीर खाननेही इथे फ्लॅट भाड्याने घेतला होता. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, इमरान खान आणि लेखा लॉशिंग्टन बांद्राच्या प्रसिद्ध कार्टर रोड येथील क्लीफेपेटच्या तीन मजली अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत. याचं महिन्याचं भाडंच तब्बल 9 लाख रुपये आहे. रियल इस्टेट डेटाबेस प्लॅटफॉर्म जैपकी नुसार, हे अॅग्रीमेंट २० मार्च 2024 पासून तीन वर्षांसाठी करण्यात आलं आहे. 

बांद्रा परिसरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. शाहरुख खान ते सचिन तेंडुलकर सर्वांचेच बांद्रा येथे आलिशान बंगले आहेत तर कोणाचे फ्लॅट आहेत. आता इमरान खानही गर्लफ्रेंडसह याच भागात शिफ्ट होणार आहे. इमरानने 2019 साली पत्नी अवंतिकापासून घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगीही आहे. कोरोना लॉकडाऊनवेळी इमरानचा घटस्फोट झालेला होता आणि नंतर तो लेखा वॉशिंग्टनच्या संपर्कात आला. दोघंही हळूहळू प्रेमात पडले आणि आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहेत.

टॅग्स :इमरान खानकरण जोहरबॉलिवूड