Join us

'या' अभिनेत्रीमुळे तुटलं इमरान खान आणि अवंतिका मलिकचं लग्न ? जवळ राहण्यासाठी घेतलं शेजारीच घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 13:21 IST

इमरान आणि तिच्या अफेअरबाबत कोणालाही माहिती नव्हती.

आमिर खानचा भाचा इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद सुरु आहेत, ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही. अवंतिकासोबत तो दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होतो. यानंतर दोघांनी लग्न केले. त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. परंतु, या प्रकरणी या दोघांकडून कोणतेही ऑफिशल स्टेटमेंट अद्याप आलेले नाही. बरेच लोक म्हणत होते की, इमरान खानच्या फ्लॉप करिअरमुळे दोघे वेगळे झाले. मात्र आता अशी बातमी समोर येतेय की, अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला. 

अवंतिका मलिकच्या सोशल मीडियावरील पोस्ट बर्‍याचदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. दोघे बऱ्याच महिन्यांपासून  एकत्र दिसले नाहीत. एकत्र कोणतीही पोस्ट नाहीत. आता बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, इमरान खान अभिनेत्री लेखाला काही काळासाठी डेट करतो आहे. लेखाचे पती पाब्लो चटर्जी आणि इमरान खान खूप चांगले मित्र होते. मात्र लेखा आणि इमरानच्या अफेअरबाबत कोणाला माहिती नाही.  'मटरू की बिजली का मन डोला'मध्ये तिने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. रिपोर्टनुसार, अवंतिका इमरानचे घर सोडले आणि इमरान खानने आपल्या मित्रांमध्ये लेखाची ओळखं करुन देण्याची सुरुवात केली होती. याचा परिणाम लेखाच्या लग्नावरही झाला आहे. याबद्दल दोन्ही कुटुंब चिंतीत आहेत. इमरानने लेखाला भेटण्यासाठी तिच्या घराशेजारीच भाड्याने घरं घेतले आहे. त्याच्या शेजार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांना लेखाला इमारतीतून येता जाता पाहिलं आहे. ही इमारत त्याच्या पाली हिल घराच्या अगदी जवळ आहे.

पत्नीबरोबर वादविवाद इमरान खान बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण जेवढे स्ट्रगल करावे लागले तेवढेच स्ट्रगल त्याला त्याच्या पर्सनल लाईफमध्ये देखील करावं लागलं. अवंतिका आणि इमरानचे लग्न 2011मध्ये झालं होतं. दोघांना एक मुलगीदेखील आहे. 

टॅग्स :इमरान खान