Join us  

पापाराझींना बघून छोटा नवाब भडकला, इब्राहिम अली खान म्हणाला-तुम्ही लोक...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 10:50 AM

इब्राहिम अली खान त्या स्टारकिड्स पैकी एक आहे जो पदार्पणाआधीच मीडियामध्ये नेहमीच चर्चेत असतो.

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान लवकरच 'सरजमीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो काजोल आणि साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान आता इब्राहिमचा एक व्हिडीओसमोर आला आहे ज्यावरुन त्याला ट्रोल करण्यात येतेयं.  इब्राहिम जीममधीन बाहेर पडताना पापाराझींना त्याला घेरलं. हे त्याला फारसं काही रुचलं नाही. 

इब्राहिम अली खान त्या स्टारकिड्स पैकी एक आहे जो पदार्पणाआधीच मीडियामध्ये चर्चेत असतो. मीडियाचे कॅमेरे त्याला नेहमी  फॉलो करत असतात. यावेळी मात्र तो पापाराझींवर नाराज झाला आहे. इब्राहिम अली खान हा पापाराझी यांच्यावर चांगलाच भडकलेला दिसला आहे.

इब्राहिम अली खान हा जिममधून बाहेर निघाल्यावर पापाराझी त्यांच्या भोवती गर्दी केली. मात्र, ते इब्राहिम अली खान याला अजिबात आवडले नाही. इब्राहिम अली खान हा पापाराझी यांच्यावर भडकतो म्हणतो की, तुम्हाला हे कसे कळते मी कुठे आहे? हे काय आहे यार...तुम्ही लोक मागेच पडले आहात माझ्या.  इब्राहिमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान करण जोहरची निर्मिती असलेला 'सरजमीं' हा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच इब्राहिमला दुसरा चित्रपटही मिळाल्याची माहिती मिळाली आहे. दिनेश विजान यांची निर्मिती असलेल्या रोमँटिक ड्रामामध्ये इब्राहिमची वर्णी लागली आहे. तूर्तास या चित्रपटाचं टायटल 'दिलेर' असं ठेवण्यात आलं असून, कुणाल देशमुख यांच्याकडे दिग्दर्शकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबतची इब्राहिमसोबतची बोलणी अखेरच्या टप्प्यात असून, अद्याप त्याची नायिका फायनल व्हायची आहे.  

टॅग्स :इब्राहिम अली खान