Join us
Daily Top 2Weekly Top 5

एरिका फर्नांडिसला साकारायची आहे 'ही' भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:30 IST

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेतील आपल्या प्रेरणा शर्माच्या भूमिकेने अभिनेत्री एरिका फर्नांडिसने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे.

ठळक मुद्देया मालिकेतही ती प्रेरणा शर्माच्या स्वभावातील विविध छटा सहजतेने साकारताना दिसते

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेतील आपल्या प्रेरणा शर्माच्या भूमिकेने अभिनेत्री एरिका फर्नांडिसने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. मालिकेत तिने एका कणखर आणि स्वतंत्र विचारांच्या महिलेची भूमिका साकारली असून ती आपल्या आणि कुटुंबियांच्या हक्कांसाठी संघर्ष करते. एरिकाने अलीकडेच सांगितले की तिला युध्दकलेत पारंगत अशा राजकन्येची भूमिका रंगविण्याची इच्छा आहे.

एरिकाने आजवर वेळोवेळी आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवून आपली योग्यता सिध्द केली आहे. तसेच या मालिकेतही ती प्रेरणा शर्माच्या स्वभावातील विविध छटा सहजतेने साकारताना दिसते. पण आपल्या या खास भूमिकेविषयी एरिका म्हणाली, “मला विविध प्रकारच्या भूमिका रंगवायला आवडतात. आता पुढील मालिकेत शक्य झाल्यास मला युध्दकलेत निपुण असलेल्या राजकन्येची भूमिका साकारावयाला फार आवडेल.”

प्रेक्षकांना आपल्या या आवडत्या अभिनेत्रीला अशा जबरदस्त भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल. ती सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत साकार करीत असलेल्या धडाकेबाज प्रेरणा शर्माच्या भूमिकेनेही प्रेक्षक आणि चाहत्यांकडून प्रशंसेची पावती मिळविली आहे. एरिकाची कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका संपून कित्येक महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षक चांगलेच मिस करत आहेत. या मालिकेतील देव, सोनाक्षी आणि चिमुकल्या विदवानला आम्ही मिस करत आहोत असे नेहमीच या मालिकेचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात. या मालिकेतील देव आणि सोनाक्षी यांची तर केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

टॅग्स :एरिका फर्नांडिसकसौटी जिंदगी की 2