Join us

दोस्तीची, प्रेमाची 'कन्नी' सोबत असल्यावर युद्धही जिंकता येतं; हृता दुर्गुळेच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:24 IST

'कन्नी' हा सिनेमा मैत्री, प्रेम आणि स्वप्न यावर याआधारित आहे.

मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळेचा (Hruta Durgule)आगामी 'कन्नी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सिनेमात हृता आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) ही रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे. दोघंही याआधी 'मन उडू उडू झालं' मालिकेत दिसले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता ही जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. 'कन्नी' हा सिनेमा मैत्री, प्रेम आणि स्वप्न यावर याआधारित आहे. सिनेमाच ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दोस्तीची, प्रेमाची कन्नी सोबत असल्यावर जगातली सगळी युद्धं अगदी सहज जिंकता येतात. 'कन्नी' हा सिनेमा हृताच्या परदेशात स्थायिक होण्याच्या स्वप्नावर आहे. या स्वप्नात तिचे जवळचे मित्र तिची कन्नी बांधतात हे दाखवलं आहे. तर अजिंक्य राऊत तिच्या प्रियकाराच्या भूमिकेत आहे. मैत्री आणि प्रेमाची सुरेख सांगड या सिनेमात असल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. तसंच सिनेमातील दोन गाणी रिलीज झाली असून ती देखील सध्या प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. आता सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपट