Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनची जॅकलीनला मदत

By admin | Updated: March 26, 2016 15:54 IST

तामिळनाडूमधील पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने 'हॅबिटट फॉर ह्युमॅनिटी' या स्वयंसेवी संस्थेशी हातमिळवणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २६ - तामिळनाडूमधील पुरग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने 'हॅबिटट फॉर ह्युमॅनिटी' या स्वयंसेवी संस्थेसाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. 'जॅकलीन बिल्ड्स' अभियानाअंतर्गत जॅकलीन फंड जमा करत आहे. या पैशातून तामिळनाडू पुरात घर गमावलेल्या 10 हजार लोकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. जॅकलीनच्या याच सामाजिक सेवेला अभिनेता  हृतिक रोशनने मदतीचा हात दिला आहे. 
 
हृतिक रोशनने जॅकलीन फर्नांडिसला चेक पाठवला आहे. जॅकलीनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हृतिकने पाठवलेल्या चेकचा आणि मेसेजचा फोटो टाकून आभार मानले आहेत.