Join us  

अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती केलाय खर्च ? ऐकून उंचावतील तुमच्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 1:12 PM

अजय-काजोलची लाडकी लेक न्यासावरही चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.

बॉलिवूड स्टारसोबत त्यांच्या मुलांवरही चाहत्यांचं लक्ष असतं. ते काय करतात, कुठे जातात हे पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अजय देवगण आणि काजोल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहे. त्यांची लाडकी लेक न्यासावरही चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. तर अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती पैसे खर्च केला आहे, याबद्दल जाणून घेऊया...

अजय देवगण आणि काजोलच्या लेकीचं शिक्षण हे इतर सेलिब्रिटी मुलांप्रमाणे मुंबईतील लोकप्रिय 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल'मध्ये झालं आहे.  रिपोर्टनुसार IGCSE विद्यार्थ्यांसाठी DAIS चं  मासिक शुल्क हे 49 हजार रुपये आहे.  न्यासाने तिचं हायस्कूल सिंगापूरमधून केल्याचं बोललं जातं. तिने 'युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशिया'मध्ये प्रवेश घेतला होता, ज्याला 'UWCSEA' म्हणूनही ओळखलं जातं. पण, न्यासाला या शाळेतून काढण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. 

व्हायरल 'रेडडिट' पोस्टनुसार, न्यासाला शाळेतून काढल्यानंतर काजोल तिथे पोहोचली होती. पण, त्याचा काही परिणामही झाला नव्हता.  या शाळेचं शुल्क हे ऑनलाइन पोर्टलनुसार अंदाजे 29 लाख 93 हजार 507 रुपये ऐवढं आहे. अजय देवगण आणि काजोल यांनी त्यांच्या मुलांच्या फीसाठी मोठी रक्कम खर्च केला आहे.  न्यासाने सिंगापूरमधील 'ग्लियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन'मध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी' विषयात शिक्षण घेतलं.  महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेतील शिक्षण शुल्क सुमारे 1 कोटी 58 लाख 71 हजार 732 रुपये आहे. तर बोर्डिंगचा खर्च  27 लाख 41 हजार 223 ऐवढा आहे.

न्यासा देवगण (Nyasa Devgn) अनेकदा चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. जेव्हा जेव्हा न्यासाचे फोटो सोशल मीडियावर येतात तेव्हा ते व्हायरल होतात. चाहते तिच्याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. रिपोर्ट्सनुसार, न्यासालाही तिची आई काजोलप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री बनायचे आहे. काजोल आणि तिची लाडाची लेक न्यासा यांच्यात खास बॉन्डिंग आहे.

टॅग्स :काजोलअजय देवगणबॉलिवूडशिक्षण