Join us  

‘रेस3’नंतर बॉलिवूडच्या ‘रेस’मध्ये किती काळ टिकणार बॉबी देओल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 9:38 AM

 ‘रेस3’ बॉक्सआॅफिसवर कमाईचे एक एक विक्रम बनवतो आहे. साहजिकच हा मल्टीस्टारर चित्रपट यातील अनेक कलाकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यापैकीचं एक नाव म्हणजे बॉबी देओल. ‘रेस3’ला बॉबीचा कमबॅक सिनेमा म्हटले जात आहे.

मुंबई : ‘रेस3’ बॉक्सआॅफिसवर कमाईचे एक एक विक्रम बनवतो आहे. साहजिकच हा मल्टीस्टारर चित्रपट यातील अनेक कलाकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यापैकीचं एक नाव म्हणजे बॉबी देओल. ‘रेस3’ला बॉबीचा कमबॅक सिनेमा म्हटले जात आहे. सलमाननंतर तो एकटा स्टार आहे, ज्याची या चित्रपटानंतर चर्चा आहे. खरे तर ‘रेस3’ रिलीज होण्यापूर्वी बॉबीच्या झोळीत अनेक प्रोजेक्ट पडलेत. पण ‘रेस3’ने त्याच्या नावाची चर्चा अधिक झाली. अर्थात ‘रेस3’मधील त्याच्या भूमिकेबद्दल सांगायचे तर हा केवळ सलमान आणि सलमान याचाच चित्रपट आहे. बॉबी तर या चित्रपटात केवळ ‘बॉडी’ देओल म्हणूनचं दिसला. बॉबीच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती. पण चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांच्या हाती निराशाचं अधिक लागली. बॉबीची भूमिका कुठल्याही अर्थाने प्रेक्षकांना प्रभावित करू शकली नाही. केवळ स्वत:ची बॉडी दाखवण्यातचं बॉबीने धन्यता मानली. अर्थात सलमान असताना हे होणारचं होते. कारण सलमानच्या कुठल्याही चित्रपटातील खरा हिरो तोच असतो. पण तरिही ‘रेस3’ हा बॉबीच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरणारा चित्रपट आहे, हे मात्र नक्की आहे 

या चित्रपटासाठी बॉबीने घेतलेली मेहनत, त्याने बनवलेली बॉडी सगळे  बघता, याचा काही फायदा त्याला नक्की मिळणार आहे. ‘रेस3’नंतर बॉबीचे फॅन फॉलोर्इंग वाढले आहे. अनेक इव्हेंटमध्ये तो दिसू लागला आहे. काल रंगलेल्या फेमिना मिस इंडियाच्या जज पॅनलमध्ये बॉबीची वर्णी लागली. एकंदर काय तर ‘रेस3’ने ग्लॅमर वर्ल्डनेही बॉबीची दखल घेतली आहे.

खरे सांगायचे झाल्यास सलमान खानमुळेचं बॉबीला ‘रेस3’ हा चित्रपट मिळाला. आता या संधीचे सोने करण्यासाठी बॉबी झटताना दिसतोय. इंडस्ट्रीत त्याला स्पेस मिळतेय, हे खचितचं कमी नाहीये आणि याचे सगळे श्रेय अर्थातचं सलमानला आहे. येत्या १५ आॅगस्टला बॉबीचा ‘यमला पगला दीवाना-फिर से’ हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाचा बॉक्सआॅफिस बिझनेसचं बॉबीचे भवितव्य ठरवणार आहे. इंडस्ट्रीतल्या ‘रेस’मध्ये तो किती काळ टिकतो, निश्चितचं हे पाहणे इंटरेस्टिंग असेल.

टॅग्स :बॉबी देओलबॉलिवूडसलमान खानसिनेमा