Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:10 IST

'हाऊसफुल २' फेम अभिनेत्री शाजान पदमसी हिने गुपचूप लग्न केलं आहे. शाजानने बिजनेसमॅन आशिष कनकियासह लग्नगाठ बांधली.

'हाऊसफुल २' फेम अभिनेत्री शाजान पदमसी हिने गुपचूप लग्न केलं आहे. शाजानने बिजनेसमॅन आशिष कनकियासह लग्नगाठ बांधली. ५ जून रोजी शाजानने आशिष कनकियासह सात फेरे घेतले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

आयुष्यातील या खास क्षणासाबा शाजानने खास लूक केला होता. शाजानने डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर आशिष कनकियाने शेरवानी घातली होती. जानेवारी महिन्यात दोघांचा रोका झाला होता. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शाजान आणि आशिष यांची भेट एका कॉमन मित्रामुळे झाली होती. त्यानंतर काही वेळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

नोव्हेंबर २०२४मध्ये शाजान आणि आशिष कनकिया यांचा साखरपुडा झाला होता. आता लग्न करत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शाजानने 'हाऊसफुल २', 'दिल तो बच्चा है जी', 'पागलपन : नेक्स्ट लेव्हल' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ती इंडस्ट्रीपासून दूर आहे. 

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी