Join us
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 16:55 IST

एंट्रेज या प्रसिद्ध चित्रपटामुळे तिला लोकप्रियता मिळाली. आजच तिने सोशल मीडियावर ती कोरोनाग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे. 

हॉलिवूडची अभिनेत्री डेबी मजार ही कोरोना या आजाराने संक्रमित असल्याचे तिने स्वत: सांगितले आहे. एंट्रेज या प्रसिद्ध चित्रपटामुळे तिला लोकप्रियता मिळाली. आजच तिने सोशल मीडियावर ती कोरोनाग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे. 

डेबी मजार हिने सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले आहे. परंतु, मी ठीक आहे. माझी तब्येत एकदम चांगली आहे. १५ मार्चला माझ्यामध्ये तीच लक्षणे दिसून आली. फक्त आता त्याची तीव्रता जास्त दिसून आली. मला १०२.४ एवढा तापही होता. मला वाटले की, मला फ्लू किंवा कोरोना झाला आहे.’

डेबीने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून कोरोनाची टेस्ट करू शकली नाही. कारण तिच्यात तसे लक्षणं दिसून आले नाहीत. पण, तिने तिच्या मित्राच्या मार्फत कोरोना टेस्ट करून घेतली आणि ती कोरोना संक्रमित असल्याचे निदान झाले. सुत्रांनुसार, डेबीला कोरोना होऊन ५ दिवस झाले आहेत. ती तिच्या तब्येतीबद्दल सांगते की, मी माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळातून जात आहे. एक दिवस चांगले वाटते तर एक दिवस माझ्या फुप्फुसांत दुखायला लागते. 

टॅग्स :हॉलिवूडकोरोना वायरस बातम्या