Watch Video : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीने दिल्या होळीच्या शुभेच्छा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 17:22 IST
सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसून येत असून, हा रंग सातासमुद्रापारही पोहचल्याचे बघावयास मिळत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिने तिच्या भारतीय फॅन्ससाठी खास तिच्या शैलीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Watch Video : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीने दिल्या होळीच्या शुभेच्छा !
सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसून येत असून, हा रंग सातासमुद्रापारही पोहचल्याचे बघावयास मिळत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिने तिच्या भारतीय फॅन्ससाठी खास तिच्या शैलीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एमाने एका व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. एमा सध्या तिच्या ‘ब्यूटी अॅण्ड द बीस्ट’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तिचा हा सिनेमा याच महिन्यात रिलिज होणार आहे. यावेळी एमाने तिच्या सिनेमाचे प्रमोशन करताना खास तिच्या शैलीत भारतीय फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये एमा, ‘नमस्ते इंडिया, तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ‘ब्यूटी अॅण्ड द बीस्ट’ हा सिनेमा बघायला विसरू नका’ असे म्हणताना दिसत आहे. १९९१ मध्ये ‘ब्यूटी अॅण्ड द बीस्ट’ या नावाने अॅनिमेटेड सिनेमा आला होता. याचाच सीक्वल नव्या रूपात प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. या सिनेमात एमाची मुख्य भूमिका असून, ही एक प्रेम कहाणी आहे. सध्या एमा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जगातील विविध देशांमध्ये फिरत असून, आपल्या फॅन्सना आकर्षित करण्याची एकही संधी ती दवडत नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय फॅन्ससाठी तर एमाने खास होळीचे निमित्त साधल्याने भारतीय प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले नसतील तरच नवल. दरम्यान, एमाच्या या शुभेच्छांना यू-ट्यूबवर धूम उडवून दिली असून, लाखोंच्या संख्येने हा व्हिडिओ बघितला जात आहे. व्हिडिओमध्ये एमाचा अंदाज बघण्यासारखा असून, तिच्या या शुभेच्छा भारतीय प्रेक्षकांना भावणार का? हे सिनेमाच्या कलेक्शनवरून स्पष्ट होईलच.