Join us

हॉलिवूडच्या या टॉप-हॉट अभिनेत्रींनी एकेकाळी चीअर लीडर बनून केला होता धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 09:54 IST

बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्येही कलाकारांना स्ट्रगल करून काम मिळवावं लागतं. हॉलिवूडच्या काही अभिनेत्री देखील स्टार होण्याआधी चीअर लीडर म्हणून काम करत होत्या. 

कोणताही स्टार हा स्टार होण्याआधी एक सर्वसामान्यच असतो. बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्येही कलाकारांना स्ट्रगल करून काम मिळवावं लागतं. हॉलिवूडच्या काही अभिनेत्री देखील स्टार होण्याआधी चीअर लीडर म्हणून काम करत होत्या. 

1) क्रिस्टन डंन्स्ट हीने हॉलिवूड सिनेमांमध्ये एक बालकलाकार म्हणून एन्ट्री केली होती. पण ती सिनेमात काम करण्याआधी शाळेत चीअर लीडर होती. 

2) मोठ्या स्क्रीनवर धमाका करण्याआधी लोकप्रिय अभिनेत्री कॅमरॉन डीयाज ही अॅडल्ड इंडस्ट्रीमध्ये काम करत होती हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याआधी ती तिच्या शहरातील एका ग्रुपची चीअर लीडर होती. 

3) हॉलिवूडमध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सॅन्ड्रा बुलक ही सुद्धा चीअर लीडर होती. सॅन्ड्रा ही हायस्कूलमध्ये चीअर लीडर होती. 

4) अभिनेत्री लिंडसे लोहान ही बालपणी मॉडलिंग म्हणून काम करत होती. पण त्यानंतर तिनेही स्टार होण्याआधी चीअर लीडरचं काम केलं आहे. 

5) जेसिका सिंम्पसन ही आठव्या वर्गात असताना शाळेत चीअर लीडर होती. 

6) अभिनेत्री मेगन फॉक्स ही सुद्धा शाळेत असताना व्हर्सिटी चीअर लिडींग टीमची सदस्य होती. 

7) प्रसिद्ध अभिनेत्री-गायिका मॅडोना सुद्धा शाळेत असताना एक चीअर लीडर होती.  

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटी