Join us  

Cannes 2022: कान्स सोहळ्यात टॉम क्रूजला अश्रू अनावर..., सुपरस्टारला रडताना पाहून सगळेच झालेत भावुक...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 5:50 PM

Tom Cruise gets emotional at Cannes Film Festival 2022: टॉम क्रूजसाठी लोक अक्षरश: वेडे आहेत. फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही हेच दिसलं. टॉम तर चाहत्यांचं प्रेम पाहून अगदी भारावून गेला. त्याला अश्रू अनावर झालेत.

Tom Cruise gets emotional at Cannes Film Festival 2022 : हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूज (Tom Cruise) जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. जगभर त्याचे असंख्य चाहते आहेत. तीनदा ऑस्कर, गोल्डन ग्लोब असे अनेक पुरस्कार जिंकणाऱ्या या अभिनेत्यासाठी लोक अक्षरश: वेडे आहेत. फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही (Cannes Film Festival 2022) हेच दिसलं. टॉम तर चाहत्यांचं प्रेम पाहून अगदी भारावून गेला. त्याला अश्रू अनावर झालेत.

कान्समध्ये टॉम क्रूजची ग्रॅण्ड एन्ट्री झाली. त्याच्या एन्ट्रीच्या वेळी कार्यक्रम स्थळी तब्बल आठ फाइटर जेट्स उडत होते. या फाईटर जेट्सनी आकाशात फ्रान्सच्या झेंड्यातील निळ्या आणि लाल रंगाची उधळण केली. अनेकांनी हा क्षण डोळ्यांत साठवला. यापेक्षाही खास म्हणजे,  Top Gun: Maverick या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान टॉमला 6 मिनिटांचं स्टँडिंग ओवेशन मिळालं. हे पाहून टॉमचे डोळे पाणावले.

 ६ मिनिटं लोकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि सुपरस्टार टॉमच्या   डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो कमालीचा भावुक झाला. ‘इथे येणं माझं स्वप्नं होतं, हा क्षण मी कधीच विसरणार नाही,’ असं टॉम यावेळी म्हणाला. 

 स्टार्स टॉम क्रुझ आणि जेनिफर कोन्नेली यांनी हॅलिकॉप्टरमधून ग्रँड एन्ट्री केली.  साऱ्यांच्या नजरा टॉमवर खिळल्या. हॅलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर टॉमने चाहत्यांना हात उंचावून अभिवानदन केलं,प्रेम दिलं आणि त्यानंतर आपल्या कारमध्ये बसून तो मूळ कार्यक्रम स्थळाच्या दिशेने रवाना झाला. त्याच्या सोबत गाड्यांचा मोठा ताफा पहायला मिळाला.टॉमचा Top Gun: Maverick  हा सिनेमा येत्या 25 मे रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलहॉलिवूड