Join us  

मृत्यूपूर्वी आणखी एक सुपरहिरो देऊन गेले Stan Lee!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 2:50 PM

एन्टरटेन्मेंट जगाला स्पायडरमॅन, आयर्नमॅन, हल्क आणि अॅव्हेंजर्सची पूर्ण फौज देणारे Stan Lee हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

एन्टरटेन्मेंट जगाला स्पायडरमॅन, आयर्नमॅन, हल्क आणि अॅव्हेंजर्सची पूर्ण फौज देणारे Stan Lee हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मार्वल कॉमिक्सचे एडिटर इन चीफ, पब्लिशर आणि चेअरमन राहिलेले Stan Lee यांचं १२ नोव्हेंबर २०१८ ला ९५ व्या वर्षी निधन झालं. त्यामुळे त्यांनी उभ्या केलेल्या सुपरहिरोंच्या चाहत्यांमध्ये दु:खं पसरलं आहे. पण या दु:खातही एक चांगली गोष्ट म्हणजे Stan Lee हे त्यांच्या फॅन्सना एक नवा सुपरहिरो देऊन गेले आहेत. 

स्टॅन ली यांची मुलगी जे.सी.ली हिने सांगितले की, 'माझे वडील आणि मी एका जॉईन्ट प्रोजेक्टवर काम करत होतो. वडिलांनी जाण्याआधी सुपरहिरोंच्या जगात आणखी एका सुपरहिरोला जन्म दिला. या सुपरहिरोचं नाव डर्ट मॅन असं आहे. डर्ट मॅनवर आम्ही खूपआधीपासून काम करत आहेत'.

जे.सी.ने सांगितले की, या नव्या सुपरहिरोची रचना करताना तिने वडिलांना विनंती केली होती की, नव्या सुपरहिरोमध्ये आधीसारखं काहीच असू नये. तो खूप वेगळा असावा. डर्ट मॅनचं आणखी थोडं काम शिल्लक आहे. आशा आहे की, लवकरच Dirt Man सिनेमाच्या पडद्यावर दिसेल. 

आता स्टॅन ली हे आपल्यात नाहीत. त्यामुळे पुन्हा आधीसारखे समाजासाठी लढणारे सुपरहिरो दिसतील का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. पण जेव्हा जेव्हा सुपरहिरोंचा विषय निघतो, तेव्हा त्यांच्यासोबत जॅक किर्बी आणि स्टीव डिट्को यांचंही नाव घेतलं जातं. या दोघांसोबतच स्टॅन ली यांनी मार्वल कॉमिक्ससाठी अनेक सुपरहिरोंची रचना केली होती. मात्र हेही खरं आहे की, या टीमचे मुख्य स्टॅन ली हेच होते. 

टॅग्स :स्टेन लीहॉलिवूड