Join us

प्रियंका चोप्राची जाऊबाईं सोफी टर्नरचा खळबळजनक खुलासा, लग्नाच्या 24 तास आधी पतीसोबत केले होते ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 16:26 IST

गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनसने लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लग्नानंतर या नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

ठळक मुद्देनिक जोनासचा मोठा भाऊ जो जोनसची ती पत्नी आहे सोफी टर्नर जो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते

गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनसने लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लग्नानंतर या नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. लग्नानंतर अनेक खुलासे ऐकायला मिळतायेत. सोफी ही प्रियंका चोप्राची जाऊ बाई आहे.  निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनसची ती पत्नी आहे. 

आज तकच्या रिपोर्टनुसार, सोफीने एक नवा खुलासा करत सगळ्यांना धक्का दिला आहे. लाग वेगासमध्ये लग्नाच्या आधी जो आणि तिचे ब्रेकअप झाले होते. सोफीने म्हणते जो सोबत राहणं ऐवढे सोपे नाही आहे. सोफीने सांगितले लग्नाला 24 तास बाकी असताना आम्ही दोघे वेगळे झालो होतो. 24 तासांसाठी दोघांनी ब्रेकअप केले होते. असे करण्यामागचे कारणही तिने स्पष्ट केले. ती म्हणाली, हे ब्रेकअप कोणत्या वादामुळे झाले नव्हते तर लग्नाच्या काहीवेळा आधी वाटणाऱ्या भीतीमुळे झाले होते. तो दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील सगळ्या खराब दिवस होता.  24 तासांनंतर शांत मनाने एकत्र आलो आणि पुढे निघालो. सोफी म्हणाली, जो ने तिला स्वत:शी प्रेम करायला शिकवलं.

जो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. निक आणि प्रियंकाच्या लग्नातही हे दोघे हजर होते. प्रियंका आणि निकनंतर जो आणि सोफी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास