Join us

Smurfs: The Lost Village : ज्युलिया रॉबटर््सने साकारली कणखर आईची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 21:37 IST

अकॅडमी पुरस्कार विजेती अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स लोकप्रिय अशा ‘स्मर्फ्स : द लॉस्ट व्हिलेज’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

अकॅडमी पुरस्कार विजेती अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स लोकप्रिय अशा ‘स्मर्फ्स : द लॉस्ट व्हिलेज’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी ज्युलिया सांगते की, ती लहान असताना स्मर्फ्सचे चित्रपट नेहमीच बघत असे. कारण त्यावेळेस हे चित्रपट खूपच लोकप्रिय होते. आताही लहानग्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे या चित्रपटात माझी भूमिका मुलांचे अधिकाधिक मनोरंजन करणारी ठरणार आहे. चित्रपटात माझे विलो नावाचे पात्र शांत आणि तेवढेच संतप्त आहे. त्याचबरोबर या भूमिकेत आत्मविश्वास आणि नेतृत्व आहे. विलो यांनी अनेक योद्धा मुलींना मोठे केले आहे. ती जे काही करते ते मनापासून करीत असते, असेही ज्युलिया हिने सांगितले. आपल्या भूमिकेविषयी अधिक विस्तृतपणे सांगताना ज्युलिया म्हणते की, जर ‘स्मर्फ्स’मध्ये पापा स्मर्फ्स हे पात्र पित्यासारखे असेल तर विलो हे पात्र आईसारखे आहे. हे पात्र अतिशय धीट, कणखर आणि सभ्य आहे. शिवाय पात्रात आव्हान पेलण्याची क्षमता असल्याने ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती असेही ज्युलियाने सांगितले. दरम्यान, हा चित्रपट पूर्णत: अ‍ॅनिमेटेड असून, त्यात ‘स्मर्फ्स’चे नवीन कथानक आहे. स्मर्फ्सफेट आणि तिचे फ्रेण्ड ब्रेनी, क्लुमसी आणि हेफ्टी हे फोर्बिडेनच्या जंगलात एका रहस्यमय खेड्याच्या शोधात पोहोचतात. तिथे त्यांची भेट दुष्ट जादूगार गार्गमेल याच्याशी होते. त्यामुळे त्यांचा हा प्रवास अतिशय आव्हानात्मक आणि धोकादायक असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन कॅली एसबरी यांनी केले आहे. लेखन स्टॅसी हारमन आणि पामेला रिबोन यांनी केले आहे. जॉर्डन कर्नर आणि मॅरी इलेन बाउडेर अ‍ॅण्ड्र्यूज यांनी निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाला डेमी लोवाटो (स्मर्फ्समेट), रॅन्न विल्सन (गार्गमेल), जो मॅँगानिएलो (हेफ्टी स्मर्फ्स), जॅक मॅकब्रेअर (क्लुमसी स्मर्फ्स), डॅनी पुदी (स्मर्फ्सब्लोसोम), एलिअल विंटर (स्मर्फ्स लिली), मॅण्डी पटिंकिन (पापा स्मर्फ्स), ज्युलिया रॉबर्ट्स (स्मर्फ्स विलो) यांनी आवाज दिला आहे.