Join us  

Britney Spears च्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीचा हंगामा, बोलवावे लागले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 5:13 PM

इतकंच काय तर तिच्या पहिल्या पतीनं ही सर्व घटना इन्स्टाग्रावर लाईव्ह देखील केल्याचं सांगितलं जात आहे.

हॉलिवूडची ४० वर्षीय पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सने (Britney Spears) हिचा २८ वर्षीय सॅम असघारीसोबत विवाह पार पडला. या जोडप्याने लॉस एंजेलिस येथे एका इंटिमेट सेरेमनीमध्ये (Britney Spears and Sam Asghari Wedding) लग्न केलं. या सोहळ्याचे फोटो अद्याप सोशल मीडियावर आलेले नाहीत, मात्र या विवाह सोहळ्यादरम्यान घटलेला नाट्यमय प्रसंग मात्र समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याची चर्चाही आहे. असे सांगितले जात आहे की ब्रिटनी स्पीयर्सचा पहिला पती जेसन अलेक्झांडरने (Jason Alexander) जबरदस्तीने तिच्या लग्नात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

रिपोर्ट्सनुसार, जेसन अलेक्झांडरने जबरदस्तीने ब्रिटनी आणि सॅमच्या लग्नात प्रवेश केला. एका सुरक्षा रक्षकाच्या हातून निसटला होता आणि त्याने आत प्रवेश केला. असेही सांगितले जात आहे की जेसनने ब्रिटनीच्या लग्नातील त्याचा हा प्रकार इन्स्टाग्रामवर लाईव्ह-स्ट्रीम केला. व्हिडीओमध्ये तो 'ब्रिटनी कुठे आहे?' असे म्हणताना ऐकू येतो. याशिवाय 'या  लग्नात काय चाललंय ते मी सांगेन' असंही तो म्हणाला होता.

एन्टरटेन्मेंट बेवसाईट टीएमझेनुसार यानंतर पोलिसांना घटनास्थळी दाखल करण्यात आलं. अधिकाऱ्यांना या ठिकाणी कोणत्या घुसखोरीची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांना अॅलेक्झांडरविरोधान अन्य प्रकरणीही वॉरंट निघाल्याचं समजलं. अशात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती व्हेन्च्युरा काऊंटी शेरीफ कार्यालयानं दिली.

२०२१ मध्ये एन्गेजमेंटब्रिटनी आणि सॅम यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सोशल मीडियावरून आपल्या एन्गेजमेंटची घोषणा केली होती. परंतु त्यांनी आपल्या विवाहाची तारीख मात्र सांगितली नव्हती. एप्रिल २०२२ मध्ये ब्रिटनीनं आपण गर्भवती असल्याचंही सांगितलं होतं. परंतु एका महिन्यानं तिचं मिसकॅरेज झाल्याची माहिती समोर आली होती.

तिसरं लग्नसॅम याच्यापूर्वी ब्रिटनीनं दोन वेळा लग्नगाठ बाधली होती. तिनं २००४ मध्ये अमेरिकन सिंगर केविन फेडरलाईन याच्यासोबत विवाह केला होता. परंतु २००७ मध्ये ते वेगळे झाले. त्यांना दोन मुलंही आहेत. यापूर्वी २००४ मध्ये तिनं जेसनसोबत विवाह केला होता. परंतु त्यांच्यातील ते नातं अवघ्या काही महिन्यांसाठी टिकलं होतं.

टॅग्स :हॉलिवूडसोशल मीडिया