Shocking : चार महिन्यात दुसऱ्यांदा केट मॉसचे नग्न फोटो झाले हॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 21:10 IST
सुपरमॉडेल केट मॉसचे काही नग्न फोटो हॅक झाल्याने ती चांगलीच अडचणीत सापडली आहे. केटने २०११ मध्ये तिच्या लग्न काळात ...
Shocking : चार महिन्यात दुसऱ्यांदा केट मॉसचे नग्न फोटो झाले हॅक
सुपरमॉडेल केट मॉसचे काही नग्न फोटो हॅक झाल्याने ती चांगलीच अडचणीत सापडली आहे. केटने २०११ मध्ये तिच्या लग्न काळात हे फोटोशूट केले होते. फोटोंमध्ये केट लग्नासाठी तयार होत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर कित्येक फोटो हॅक झाल्याने, तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. २०११ मध्ये केटने रॉकर जॅमी हीस याच्यासोबत लग्न केले होते. मात्र त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. आता हे दोघे विभक्त झाले आहेत. डेलिस्टार डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, केटचे हे सर्व फोटो तिच्या कॉम्प्युटरमधून हॅक केले जाण्याची शक्यता आहे. आता असे म्हटले जात आहे की, केटचे हे फोटो तिच्या फॅन्सला शेअर केले जात असून, त्यातून मोठी रक्कमही वसूल केली जात आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामुळे केट खूप निराश झाली असून, हॅकर्सचा लवकरात लवकर शोध घेतला जावा यासाठी ती आटापिटा करीत आहे. वास्तविक पाहता ती केट जॅमीपासून विभक्त झाली आहे. त्यामुळे त्याच्यासोबतच्या लग्नकाळातील फोटोंबाबत केटने एवढा आटापिटा करणे फारशे संयुक्तिक नसल्याचे बोलले जात आहे. मात्र तिच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व फोटो केटसाठी स्पेशल होते. शिवाय तिचे खासगी असल्याने ती त्रस्त झाली आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वीदेखील तिचे काही फोटोज् आॅनलाइन लीक झाले होते. त्यामुळे संबंधित हॅकर्सचा कुठल्याही परिस्थितीत शोध घेतला जावा, अशी मागणी आता केट करीत आहे. केटबरोबर चार महिन्यांत ही दुसरी घटना घडल्याने तिची आॅनलाइन सुरक्षा वाढविली आहे.