Join us

SHOCKING : सेक्स, बलात्कार, हिंसा यामुळे बॅन करण्यात आले हे जगातील 10 वादग्रस्त चित्रपट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 17:55 IST

हॉलिवूड सिनेमा आणि वादांचे खुप जुने नाते आहे. सिनेमांमधील आक्षेपार्ह सीन्समुळे अनेक देशांमध्ये त्यांच्यावर बंदी घातली जाते. बॉलीवुड मध्ये ...

हॉलिवूड सिनेमा आणि वादांचे खुप जुने नाते आहे. सिनेमांमधील आक्षेपार्ह सीन्समुळे अनेक देशांमध्ये त्यांच्यावर बंदी घातली जाते. बॉलीवुड मध्ये अशा चित्रपटांवर सेंसर कात्री लावते. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या अशाच 10 सिनेमांची माहिती देणार आहोत. लांब रेप सीन, हिंसा, एखाद्या समुदायाचा अपमान, एखाद्या देशाची प्रतिमा मलिन करणारे सीन आदी कारणांमुळे बॅन झालेले सिनेमे…1. Salò, or the 120 Days of Sodom कधी झाला रिलीज : 1975-76कुठला आहे चित्रपट : इटली/फ्रांसबॅनचे कारण: फिल्म न्यूडिटी, सेक्स सीन आणि हिंसा.2. Cannibal Holocaustकधी झाला रिलीज : 1980कुठला आहे सिनेमा : इटलीबॅनचे कारण : सिनेमात प्राण्यांवर अतिशय क्रुरता दाखवण्यात आली होती. हिंसात्मक सीनमुळे हा सिनेमा वादात अडकला होता.3. Faces of Deathकधी झाला रिलीज : 1978कुठला आहे सिनेमा : यूएसबॅनचे कारण : सिनेमात व्हिएतनाम आणि अॅडॉल्फ हिटलर यांच्यातील युद्धाच्या काळातील फुटेजमध्ये नापलम बॉम्ब स्फोट, अॅक्सीडेंट, रिअल डेथ सीन चित्रीत करण्यात आले होते. या कारणांमुळे सिनेमा वादात अडकला होता आणि त्यावर बंदी घालण्यात आली होती.4.The Last House on the Leftकधी झाला रिलीज : 1972कुठला आहे सिनेमा : यूएसबॅनचे कारण : सिनेमात बलात्कार, शारीरिक छळ आणि हिंसा दाखवण्यात आल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती.5.Ichi the Killerकधी झाला रिलीज : 2001कुठला आहे सिनेमा : जापानबॅनचे कारण : अत्याधिक हिंसा आणि क्रूरता दाखवण्यात आल्याने US आणि जर्मनी वगळता इतर देशांत सिनेमा बॅन करण्यात आला होता. 6.A Clockwork Orangeकधी झाला रिलीज : 1971कुठला आहे सिनेमा : यूके/यूएसबॅनचे कारण : सेक्स सीनचा भडीमार आणि अति हिंसा दाखवण्यात आल्याने हा सिनेमा साऊथ कोरिया, मलेशिया, सिंगापूर आणि स्पेनमध्ये बॅन करण्यात आला होता.7.The Last Temptation of Christकधी झाला रिलीज : 1988कुठला आहे सिनेमा : यूएस/कॅनडाबॅनचे कारण : सिनेमात ईशा मसीहांचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे ख्रिश्चन समुदायाने रोष व्यक्त केला होता. हिंसा आणि बॉम्बस्फोटांनंतर सिनेमाच्या रिलीजवर मॅक्सिको, अर्जेंटीना, तुर्की या देशांत बंदी घालण्यात आली होती.8.The Texas Chain Saw Massacreकधी झाला रिलीज : 1974कुठला आहे सिनेमा : यूएसबॅनचे कारण : सिनेमात क्रूर हत्या आणि अति हिंसा दाखवण्यात आल्याने त्यावर ब्राझिल, आयरलँड, नॉर्वे आणि ऑस्ट्रेलियात बंदी घालण्यात आली होती.9.Caligula कधी झाला रिलीज : 1979कुठला आहे सिनेमा : इटली/यूएसबॅनचे कारण : एका मॅगझिनने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हा पहिला असा सिनेमा होता, ज्यामध्ये अॅक्टर आणि अॅक्ट्रेस पोर्न सिनेमांमध्ये अभिनय करताना दिसले होते. सेक्स सीन्स आणि न्युडिटीमुळे सिनेमा अनेक देशांत बॅन करण्यात आला होता.10. I Spit on Your Graveकधी झाला रिलीज : 1978कुठला आहे सिनेमा : यूएसबॅनचे कारण : प्रदीर्घ रेप सीनमुळे आयरलँड, नॉर्वे आणि आइसलँड या देशांत हा सिनेमा बॅन करण्यात आला होता.