सेलेना गोमेज ‘इट अॅण्ड मी’मधून परतणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 20:09 IST
तब्बल तीन वर्षे संगीत जगतापासून दूर असलेली गायिका तथा अभिनेत्री सेलेना गोमेज पुन्हा एकदा आपल्या आवाजाने प्रेक्षकांना घायाळ करण्यास ...
सेलेना गोमेज ‘इट अॅण्ड मी’मधून परतणार!
तब्बल तीन वर्षे संगीत जगतापासून दूर असलेली गायिका तथा अभिनेत्री सेलेना गोमेज पुन्हा एकदा आपल्या आवाजाने प्रेक्षकांना घायाळ करण्यास सज्ज झाली आहे. नार्वे येथील डीजे क्योगी याच्यासोबत ती ‘इट ऐन्ट मी’ या नव्या अल्बममधून परतणार आहे. पीपुल डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सेलेना गोमेज हिनेच याबाबतची माहिती तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. यावेळी तिने एक गाणही खास तिच्या फॅन्ससाठी शेअर केले आहे. सेलेना पुन्हा परतणार असल्याने तिच्या फॅन्सनी याविषयी समाधान व्यक्त केले असून, तिचे या गाण्यास जबरदस्त हिट मिळत आहेत.}}}} सेलेनाने केलेल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, अखेर मी परतले! या गाण्यात मद्यपानाच्या सवयीमुळे प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा दाखविण्यात आला आहे. २०१५ मध्ये सेलेनाचा अखेरचा ‘रिवायवल’ हा अल्बम आला होता. त्यानंतर आता ती पुन्हा परतली आहे. यादरम्यानच्या काळात सेलेना ‘१३ रिजन्स वाय’ या टीव्ही मालिकेची निर्माता म्हणून काम करीत होती. टीव्ही मालिकेच्या व्यस्ततेमुळे ती संगीत क्षेत्रापासून दूर होती. आता पुन्हा ती नव्या अल्बमच्या माध्यमातून परतणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी हा एक प्रकारचा सुखद धक्काच समजला जात आहे. दरम्यान, सेलेनाने केलेल्या ट्विटला आतापर्यंत हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळत असल्याने सेलेना जाम खूश आहे.