स्कारलेट म्हणते, फक्त एकच लग्न करणे म्हणजे नुकसानच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 22:04 IST
अभिनेत्री स्कारलेट जॉनसन भलेही एका मुलाची आई असली तरी, लग्नाबाबतचे तिचे विचार खूपच मोकळे आहेत. तिच्या मते केवळ एकदाच ...
स्कारलेट म्हणते, फक्त एकच लग्न करणे म्हणजे नुकसानच
अभिनेत्री स्कारलेट जॉनसन भलेही एका मुलाची आई असली तरी, लग्नाबाबतचे तिचे विचार खूपच मोकळे आहेत. तिच्या मते केवळ एकदाच लग्न करणे खूपच अस्वाभाविक वाटतेय. त्याचबरोबर एकाच व्यक्तीबरोबर संबंध ठेवून आयुष्य व्यतित करणेही अवघड आहे. त्यामुळे एक लग्न म्हणजे एक प्रकारचे नुकसानच होय. ई-आॅनलाइनच्या रिपोर्टनुसार, ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ या सिनेमात झळकलेल्या स्कारलेटला विवाहाप्रती खूपच आकर्षण आहे. लग्नाच्या बंधनात अडकणे तिला खूपच रोमांचक असे वाटते. कारण तिच्या मते, जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवत असाल तर काही गोष्टी गमवाव्यादेखील लागतात. याविषयी अधिक तपशीलवारपणे सांगताना स्कारलेट म्हणते की, खरं म्हणजे एक लग्न करणे नुकसानच आहे. कारण यामध्ये तुम्हाला केवळ एकाच व्यक्तीची निवड करावी लागते. खरं तर लग्न हा विचारच मनाला प्रफुल्लित करणारा असतो. हा प्रसंग आयुष्यातील एका गोड स्वप्नासारखे असते. मात्र अशातही केवळ एकाच व्यक्तीबरोबर लग्न करणे न पटणारे आहे. त्यामुळे मला असे वाटतेय की, या विचारानेच मी घाबरलेली असावी. ३२ वर्षीय स्कारलेटने पहिल्यांदाच लग्नाबाबत अशाप्रकारचे वक्तव्य केले असे नाही, तर यापूर्वीदेखील तिने मी लग्न करण्यास घाबरत असल्याचे म्हटले होते. यावेळी तिने तिच्या एका मित्राचेदेखील उदाहरण दिले होते. बरेच दिवस लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. मात्र नंतर त्यांच्यात तणाव निर्माण झाला अन् ते विभक्त झाले, असे तिने म्हटले होते. स्कारलेट असा का विचार करीत असावी, याचा अंदाज लावणे अवघड आहे.