Join us

स्कारलेट जोहान्सनने ‘यासाठी’ लोकांना हात जोडून म्हटले, तोंड गप्प ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 21:05 IST

अभिनेत्री स्कारलेट जोहान्सनने पती रोमेन डॉरिएक याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी गेल्या मंगळवारीच अर्ज दाखल केला होता; मात्र आता तिला पतीपासून ...

अभिनेत्री स्कारलेट जोहान्सनने पती रोमेन डॉरिएक याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी गेल्या मंगळवारीच अर्ज दाखल केला होता; मात्र आता तिला पतीपासून घटस्फोट घेतल्याची भीती वाटत आहे. तिची ही भीती रोमेनपासून दूर जाण्याची नसून घटस्फोटांवर लोकांकडून केल्या जात असलेल्या उलटसुलट चर्चांची आहे. त्यामुळे तिने लोकांना हात जोडून विनंती केली की, माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर कोणीही बोलू नये. स्कारलेट जोहन्सनच्या मते, मी कधीही रोमेन डॉरिएक याच्याशी तुटलेल्या विवाहसंबंधांवर बोलणार नाही. त्यामुळे लोकांनीही याविषयी कुठेही न बोलता आपले तोंड गप्प ठेवावे. स्कारलेटचा हा सर्व आटापिटा तिच्या मुलीसाठी असून, तिच्या व्यक्तिगत आयुष्यावर याचा कुठल्याही परिणाम होऊ नये असे तिला वाटत आहे. स्कारलेटने दोन वर्षांच्या वैवाहिक संबंधानंतर गेल्या मंगळवारी रोमेनसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तिने कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ईआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, स्कारलेटने एक स्टेटमेंट देताना म्हटले की, एक चांगली आई होण्याच्या नात्याने मी माझ्या मुलीवर माझ्या घटस्फोटाविषयीचा कुठलाही परिणाम होऊ देऊ इच्छित नाही. मी एवढेच सांगू इच्छिते की, आमचे वैवाहिक संबंध तुटल्याविषयी मी कधीच बोलणार नाही. त्यामुळे लोकांनी आणि मीडियाने याचा सन्मान करत, माझ्या खासगी जीवनावर कुठल्याही प्रकारची चर्चा करू नये. दरम्यान, स्कारलेटने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताच मुलगी रोज डोरोथी डॉरिएक हिचा ताबा मिळविण्यासाठी रोमेन प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्कारलेट आणि रोमेन २०१२ मध्ये एकमेकांना भेटले होते. २०१४ मध्ये दोघीही विवाहबंधनात अडकले. पुढे त्यांच्या संसारात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले; मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नाहीत. २०१६ मध्येच त्यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.