Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॅपर कान्ये वेस्टने मॉडेल्सला ‘ही’ वस्तू वापरण्यावर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 19:33 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दशियां हिचा पती रॅपल कान्ये वेस्ट हा त्याच्या कामात नेहमीच परफेक्ट असतो. कुठलाही इव्हेंट यशस्वीपणे ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दशियां हिचा पती रॅपल कान्ये वेस्ट हा त्याच्या कामात नेहमीच परफेक्ट असतो. कुठलाही इव्हेंट यशस्वीपणे पार पडावा, असा त्याचा अट्टहास असल्याने तो प्रत्येक गोष्टीचा अतिशय काळजीपूर्वक विचार करीत असतो. आता हेच बघा ना, ‘यीजी सीजन-५’ या फॅशन शोसी संबंधित कुठलीही माहिती बाहेर लिक होऊ नये म्हणून त्याने चक्क शोमधील मॉडेल्सला मोबाइल वापरण्यावर बंदी घातली. ३९ वर्षीय कान्ये वेस्टने गेल्या बुधवारी न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये त्याचे नवे ड्रेस कलेक्शन सादर केले होते. मिरर डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्याने सादर केलेल्या या ड्रेस कलेक्शनची माहिती बाहेर लिक होऊ नये म्हणून त्याने रिहर्सल दरम्यान सर्व मॉडेल्सला मोबाइल वापरण्यावर सक्त मनाई केली. विशेष म्हणजे या फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या कायली जेनर आणि अन्ना विन्टूअर यांनादेखील त्याने मोबाइलचा वापर करू दिला नाही. या फॅशन शोमध्ये कान्येची पत्नी किम कर्दशियां, ट्यागा, हॅले बाल्डविन, जो क्राविट्स आदि सेलिब्रेटी सहभागी झाले होते. कान्येच्या मोबाइल बंदी आदेशामुळे सुरुवातीला फॅशन जगतात आश्चर्य व्यक्त केले गेले. काही सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रियादेखील दिल्या. मात्र कान्येनी या नकारात्मक प्रतिक्रियांचा फारसा विचार न करता बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. गेल्या काही दिवसांपूर्वी एका कॉन्सर्टदरम्यान कान्ये वेस्ट स्टेजवरच कोसळला होता. त्यानंतर त्याला बराच काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. आता तो पूर्णत: तंदुरुस्त असून, संगीत आणि फॅशनकडे त्याने लक्ष केंद्रित केले आहे.