Join us

अमेरिकेतील आगीच्या ऑस्करला झळा! Oscar 2025 सोहळा रद्द होणार? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:07 IST

अमेरिकेतील या आगीच्या झळा आता ऑस्करपर्यंत पोहोचल्या आहेत. या आगीमुळे ऑस्कर सोहळा रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून आगीने थैमान घातलं आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली ही आगी लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड हिल्सपर्यंत येऊन पोहोचली आहे. या आगीत केवळ हॉलिवूड सेलिब्रिटींची नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींची घरंदेखील जळून खाक झाली आहेत. अमेरिकेतील या आगीच्या झळा आता ऑस्करपर्यंत पोहोचल्या आहेत. या आगीमुळे ऑस्कर सोहळा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. 

ऑस्कर हा मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिष्ठित असा अवॉर्ड आहे. पण, यंदाच्या ऑस्करवर अमेरिकेत लागलेल्या आगीचं संकट आहे. ही आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळेच २०२५ मध्ये होणारा ऑस्कर सोहळादेखील रद्द होऊ शकतो. ९६ वर्षांत अकादमी अवॉर्डस रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत लागलेल्या या आगीमुळे मात्र ऑस्कर बोर्ड कमिटी चिंतेत आहे. 

"ऑस्कर सोहळा झाला तर लोक आगीच्या नुकसानीत असताना आपण सेलिब्रेट करतोय, असं वाटेल या चिंतेत सध्या ऑस्कर कमिटी बोर्ड नाही. जरी काही दिवसांत आग आटोक्यात आली तरी संपूर्ण शहरावर याच्या जखमा आहेत. आणि यातून बाहेर पडायला लोकांना वेळ लागेल. त्यामुळेच जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सपोर्ट करून आर्थिक निधी प्राप्त करून देत साहायता करण्यावर कमिटीचा भर असेल", अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अमेरिकेतील आगीमुळे ऑस्करचा नामांकन सोहळादेखील पुढे ढकलण्यात आला आहे. ९७व्या अकादमी अवॉर्ड सोहळ्यातील नामांकने आता २३ जानेवारीला घोषित करण्यात येणार आहेत. तर २ मार्चला ऑस्कर २०२५ आयोजित केला गेला आहे.  

टॅग्स :ऑस्करऑस्कर नामांकनेअमेरिकाआग