OSCARS 2017 : ‘आॅस्कर’ जिंकून देव पटेल बनणार पहिला भारतीय अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 16:04 IST
यंदाचा ८९वा आॅस्कर अवॉर्ड सोहळा भारतासाठी खºया अर्थाने महत्त्वपूर्ण समजला जात आहे. कारण भारतीय अभिनेता देव पटेल याच्या ‘लायन’ ...
OSCARS 2017 : ‘आॅस्कर’ जिंकून देव पटेल बनणार पहिला भारतीय अभिनेता?
यंदाचा ८९वा आॅस्कर अवॉर्ड सोहळा भारतासाठी खºया अर्थाने महत्त्वपूर्ण समजला जात आहे. कारण भारतीय अभिनेता देव पटेल याच्या ‘लायन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता या श्रेणीत नामांकन मिळाले असून, काही क्षणांतच तो पहिला आॅस्कर विजेता भारतीय अभिनेता ठरण्याची शक्यता आहे. या अगोदर संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासह अनेक कलाकारांनी विविध श्रेणींमध्ये आॅस्कर पुरस्कार मिळविला आहे, परंतु अभिनय श्रेणीत आॅस्कर मिळवणारा देव पटेल हा पहिलाच भारतीय अभिनेता ठरण्याची शक्यता आहे. या अगोदर भारताशी संबंधित ‘गांधी’ (१९८३) या चित्रपटासाठी ब्रिटिश अभिनेता बेन किंग्सले याला सर्वश्रेष्ठ अभिनेता या श्रेणीत आॅस्कर मिळालेला आहे. बेनच्या वडिलांचा गुजरात संबंध असल्याने त्याचा काहीअंशी भारताशी संबंध असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. दरम्यान, देव पटेल याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता या श्रेणीत महेर्शाला अली (मूनलाइट), जेफ ब्रिजेस (हेल अॅण्ड हाय वॉटर) आणि लुकास हेजेज (मेनचेस्टर बाय थे सी) हे टक्कर देणार आहेत. मात्र यामध्ये देव पटेलचे पारडे जड समजले जात आहे. अशातही देव पटेलचा मुकाबला महेर्शाला अली याच्याशी होण्याची शक्यता आहे. जर अलीने हा अवॉर्ड जिंकला, तर आॅस्कर जिंकणारा पहिला मुस्लीम अभिनेता म्हणून अली यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिटिश फिल्म अवॉर्डसमध्ये देव पटेल याला ‘लायन’साठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून गौरविण्यात आले होते. गार्थ डेविस यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात देव पटेल अशा एका भारतीय तरुणाची भूमिका साकारत आहे, जो लहानपणी कोलकाता येथून त्याच्या परिवारापासून हरवला जातो. पुढे त्याला आॅस्ट्रेलियातील एक परिवार दत्तक घेते. मोठा झाल्यानंतर तो गुगलच्या साहाय्याने त्याच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी पुन्हा भारतात येतो. या सिनेमाला पाच श्रेणीमध्ये नामांकने मिळाली आहे. बेस्ट फिल्म, बेस्ट सर्पोर्टिंग अॅक्टर, बेस्ट म्युझिक, सिनेमेटोग्राफी या श्रेणींमध्ये हा सिनेमा इतिहास रचण्याची शक्यता आहे.