Join us

OSCARS 2017: अकॅडमी अवॉर्ड्सच्या आयोजकांनी मागितली जाहीर माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 16:55 IST

सकाळपासून आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेल्या गोंधळाचीच चर्चा सुरू आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विजेत्याचे नाव घोषित करताना झालेल्या चुकीमुळे आयोजकांवर मोठी ...

सकाळपासून आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेल्या गोंधळाचीच चर्चा सुरू आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विजेत्याचे नाव घोषित करताना झालेल्या चुकीमुळे आयोजकांवर मोठी नामुष्की ओढवली गेली. बेस्ट फिल्मचा अवॉर्ड प्रदान करण्यासाठी आलेल्या वॅरेन बेटी आणि फे डुनावे यांनी आधी चुकीने ‘ला ला लँड’ला विजेता घोषित केले. मात्र चुक लक्षात येताच दुरुस्ती करीत ‘मूनलाईट’ला स्टेजवर पाचरण करण्यात आले.अशी अक्षम्य चुक लाईव्ह कार्यक्रमात झाल्यामुळे सर्वत्रच याबाबत टीका आणि ट्रोलिंग सुरू आहे. झालेल्या चुकीबाबत माफी मागण्यासाठी अ‍ॅकडमीने ‘प्राईसवाटरहॉऊस कूपर्स’या कंपनीमार्फत माफीनामा जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, झालेल्या प्रकारामध्ये वॅरेन बेटी आणि फे डुनावे यांची काहीही चुक नसून विसंवादामुळे चुकीचे पाकीट त्यांना देण्यात आले.ALSO READ: आॅस्कर पुरस्कारांमध्ये गोंधळ; सोशल मीडिया जोक्सला आले उधाण!‘आम्ही मनापासून ‘मूनलाईट’, ‘ला ला लँड’, वॅरेन बेटी, फे डुनावे आणि आॅस्कर सोहळा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांची मनापासून माफी मागतो,’ असे या माफीनाम्यात म्हटले आहे. प्रेझंटर्सना चुकीच्या विभागातील पाकीट दिल्या गेल्यामुळे नावाचा घोळ झाला. ‘ही चुक कशामुळे झाली याचा आम्ही तपास करीत असून झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. अकॅडमी, सर्व नामांकित मान्यवर, होस्ट जिमी किमेल यांनी अत्यंत खुबीने ही परिस्थिती सांभाळली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.’८९व्या अकॅडमी अवॉर्डसमध्ये  ‘मूनलाईट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर  सहा पुरस्कारांसह ‘ला ला लँड’ आघाडीवर राहिला. १४ नामांकनांपैकी त्याने दिग्दर्शन, अभिनेत्री, पार्श्वसंगीत, गीत, छायांकन आणि प्रोडक्शन डिझाईन या विभागांत विजय मिळवला. केसी अ‍ॅफ्लेक बेस्ट अ‍ॅक्टर तर एमा स्टोन बेस्ट अभिनेत्री म्हणून विजेती ठरली.ALSO READ: ​स्कर पुरस्कारावर बॉलीवूड सिलेब्रेटींची टिंगलटवाळी!