Oscar Trophy: "अँड द ऑस्कर गोज टू…" हे शब्द ऐकण्यासाठी कलाविश्वातील प्रत्येक कलाकार आतूर असतो. आपल्या कलाकृतीला ऑस्कर मिळावा, यासाठी मेहनत घेतली जाते. आयुष्यात एकदा तरी ऑस्कर पटकावयाचाच असं तर अनेक जण स्वप्न पाहतात. फिल्मी जगतात ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खूप मान मिळतो. याशिवाय हा पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेत्याचे आणि दिग्दर्शकाचे ब्रँडिंगही चांगले होते. २४ कॅरेट सोन्याचं पाणी चढवलेली ही ऑस्कर ट्राॅफी अनेकाचं स्वप्न असतं. पण, अवाढव्य खर्चात बनवलेली ऑस्कर ट्राॅफी विकल्यास किती पैसे मिळतात? तुम्हाला माहितेय. ऑस्कर ट्राॅफी विकल्यानंतर मिळणारी किंमत वाचून तुमचा विश्वासही बसणार नाही.
जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेली ऑस्कर ट्रॉफी बनवण्यासाठी मोठा खर्च होतो. तब्बल ४०० डॉलर्स म्हणजे जवळपास ३५ हजार रुपये खर्च होतो. प्रत्येक ट्रॉफी, १३.५ इंच उंच आणि ८.५ पौंड वजनाची असते. तिच्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला असतो. या मौल्यावान ट्रॉफीची किंमत किती असेल, असे तुम्हाला वाटते? अवॉर्ड विकला तर मोक्कार पैसा मिळेल, असा समज असतो. पण, तसे नाही. एखाद्या विजेत्याने ही ट्रॉफी विकायची ठरवली, तर त्याला केवळ ८७ रुपये मिळतील.
ऑस्कर विजेत्याला कोणत्याही कलाकाराला, कोणत्याही परिस्थितीत ऑस्कर अवॉर्ड विकता येत नाही. जर त्यांना परत करायची असेल तर ती फक्त अकादमीलाचा देऊ शकतात. ऑस्करची स्वतःची खासियत आहे. त्यामुळे नियमांनुसार, विजेता ही ट्रॉफी ऑस्कर अकादमीला १ डॉलर्सच्या किंमतीत म्हणजेच आताच्या जवळपास ८७ .३० रुपयांमध्ये विकू शकतो. दरम्यान, आता अलिकडेच लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९७ व्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2025 Awards) सोहळा पार पडला. यंदाच्या ऑस्करमधून भारताची निराशा झाली आहे.