Join us

ओपरा विनफ्रेने केले २० किलो वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 22:26 IST

टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा असलेली ओपरा विनफ्रे तिच्या संंभाषण कौशल्याबरोबरच तिच्या वजनामुळेही चर्चेत असते. मात्र याविषयी तिने नुकताच खुलासा ...

टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा असलेली ओपरा विनफ्रे तिच्या संंभाषण कौशल्याबरोबरच तिच्या वजनामुळेही चर्चेत असते. मात्र याविषयी तिने नुकताच खुलासा केला असून, तब्बल २० किलो म्हणजेच ४५ पाउंड वजन कमी केल्याचे म्हटले आहे. एसशोबिज या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ६३ वर्षीय विनफ्रेने म्हटले की, वजन कमी करण्यासाठी तिने वर्षानुवर्ष डायटिंग करण्याचा अजिबात पर्याय निवडला नाही. याउलट तिने आपल्या जीवनशैलीत बदल करून वजन कमी करण्याचे लक्ष सहज साध्य केले. २० किलो वजन कमी केल्याचा आनंद होत असल्याचेही ओपराने सांगितले. पुढे बोलताना ओपेरा म्हणाली की, वजन वाढणे हे आरोग्यासाठी हानीकारक आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाने वजनवाढीवर विशेष लक्ष द्यायला हवे. माझे वजन वाढत असल्याने मी चिंतेत होती. परंतु जेव्हा मी वजन कमी करण्यासाठी काही उपाय केले तेव्हा मी यात यशस्वी होऊ शकते, याबाबतचा आत्मविश्वास निर्माण झाला. आता मला माझे वजन कमी ठेवण्यात सातत्यता आणायची असल्याचेही ओपेरा म्हणाली.टीव्ही जगतात वावरताना ओपेराने स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. कृष्णवर्णीय असताना ओपेरा जगप्रसिद्ध आहे. अर्थात यासाठी तिला कठोर मेहनत घ्यावी लागल्याचे वारंवार तिने सांगितले आहे.